loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर पोलीस स्थानकाबाहेर अडुर बौद्ध ग्रामस्थांचे उपोषण; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांची उपोषणस्थळी भेट

वरवेली वार्ताहर गुहागर तालुक्यातील अडूर गावातील बौध्द विहारमध्ये जयंती व महापरिनिर्वाण दिनी जाण्यास पोलिस निरीक्षक यांनी मज्जाव केल्याने त्यांची बदली करण्याची मागणी तेथील बौद्ध बांधवांकडून होत आहे. या मागणीसाठी बौद्ध ग्रामस्थ गेली दोन दिवसांपासून गुहागर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला सोमवारी २७ जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी भेट घेऊन उपोषणकर्त्यांच्या भावना जाणून घेत जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यासमोर उपोषणकर्त्यानी घडलेला सर्व प्रकार कथन केला. ग्रामस्थांची भावना समजून घेतल्यानंतर त्यांनी केलेल्या मागणीसंदर्भात अण्णा जाधव यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्याशी उपोषणस्थळावरून थेट संपर्क साधून चर्चा केली. त्यानंतर गुहागर तहसीलदार यांची देखील भेट घेत ग्रामस्थांचे म्हणणे आपल्या चर्चेतून मांडून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. दरम्यान पोलीस ठाण्यात दाखल झालेले चिपळूण उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्याशी संवाद साधला. मुळात हा प्रश्न दोघांचा असला तरीही सुद्धा जबाबदार अधिकाऱ्यांनी संयम ठेवून बोलावं लागते, कारण आपल्या अधिकारपदावरील खुर्चीवर बसलेले असता, आपल्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणून आपण समजून घेऊन वागले पाहिजे. परंतु जे काही पोलीस अधिकाऱ्यांकडून काही शब्द तोंडून निघाले असतील पण त्यावेळी दिलगिरी व्यक्त करून हा विषय संपुष्टात आणला असता तर ही वेळ आली नसती, त्यामुळे पोलीस अधीक्षक यांना उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांचे म्हणणं मांडू दे अशी विनंती केल्याचे यावेळी बोलताना जाधव यांनी बौद्ध ग्रामस्थांना सांगितले.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बौद्ध ग्रामस्थांनी छेडलेल्या उपोषणाला वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी उत्तर जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले आहे. यावेळी संतोष पवार, विनोद पवार, सुदेश कांबळे, शरद जाधव संदेश मोहिते, नारायण मोहिते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने, तहसीलदार यांच्याशी चर्चा

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts