loader
Breaking News
Breaking News
Foto

उल्का विश्वासराव यांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला उपजिल्हा संघटकपदी तर दत्ता कदम यांची उपजिल्हाप्रमुखपदी निवड---

लांजा (वार्ताहर) - लांजा येथील धडाडीच्या महिला कार्यकर्त्या उल्का विश्वासराव यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला उपजिल्हा संघटकपदी (लांजा - राजापूर विधानसभा) तर ज्येष्ठ शिवसैनिक दत्ता कदम यांची उप जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. उल्का विश्वासराव या लांजा आणि राजापूर या दोन्ही तालुक्यातील राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांनी लांजा तालुक्यासह राजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला आहे. तालुक्यातील गावागावांमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या या एकूणच कार्याची दखल घेत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि नेते विनायक राऊत यांनी उल्का विश्वासराव यांची महिला उप जिल्हा संघटकपदी निवड जाहीर केली आहे. तर दत्ता कदम हे देखील तालुक्यातील राजकारणात सक्रिय आहेत. लांजा पंचायत समितीचे सभापतीपद तसेच जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापतीपद त्यांनी भूषविलेले आहे. यापूर्वी त्यांनी उप जिल्हाप्रमुखपद देखील सांभाळलेले आहे. एक ज्येष्ठ व प्रामाणिक शिवसैनिक म्हणून त्यांची तालुक्यातील राजकारणात ओळख आहे. तालुक्यातील राजकारणात त्यांना आदराचे स्थान आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, बोलताना दत्ता कदम आणि उल्का विश्वासराव यांनी सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सचिव विनायक राऊत यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर जी महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्याबद्दल आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मनापासून आभारी आहोत. आगामी काळात सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांना सोबत घेवून लांजा आणि राजापूर या दोन्ही तालुक्यात पक्ष संघटना वाढविण्यासाठी आणि पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. गेल्या अनेक वर्षांचा आपल्याला राजकारणातील असलेला अनुभव हा आपण शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी करून पक्ष संघटना अधिक मजबूत करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व सचिव तथा नेते विनायक राऊत यांचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे दत्ता कदम आणि उल्का विश्वासराव यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts