loader
Breaking News
Breaking News
Foto

उच्च शिक्षणासह कौशल्य विकास सुविधांची गरज शिक्षणा साठी प्रत्येक तालुक्यात भरघोस निधी आणणार : ना योगेश दादा कदम

खेड - खेड विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुणेसारख्या ठिकाणी जावे लागते. यामुळे स्थानिक स्तरावरच उच्च शिक्षणासह कौशल्य विकासाच्या सुविधा उपलब्य करून देणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले. तालुक्यातील खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व पी.के. दरेकर महाविद्यालयात कनिष्ठ 'स्नेहगंध' कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, शिवसेना नेते रामदास कदम यांनी शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी नानाविध उपक्रम राबवले. याचमुळे तालुक्यात शैक्षणिक विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. गृह, महसूल, ग्रामविकास व इतर महत्त्वाची खाती सांभाळत असताना तालुक्यासह कोकणच्या विकासाला प्राधान्य दिले जाणार असल्याची ग्वाही देत कोकणचा कायापालट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणार असल्याचेही सांगितले. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या सहकार्याने प्रशालेच्या वर्गखोल्यांसाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. यापुढेही संस्थेला सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाहीही मंत्री कदम यांनी शेवटी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष विजय दरेकर यांच्य हस्ते मंत्री योगेश कदम यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष मन्सूर जोगिलकर, सेक्रेटरी धनंजय दरेकर, सहसेक्रेटरी अविनाश वाडेकर, खजिनदार मनोहर दळवी, संचालक दिलीप राणे, चंद्रकांत दळवी, वैभव दरेकर, रफिक नांदगावकर, महेंद्र दळवी, सुनील शिंदे, रश्मी वालणकर, आझाद नांदगावकर, संतोष पवार, लहू सुर्वे, प्राचार्य विजयकुमार माळी, विद्यार्थी प्रतिनिधी दीप यादव, सार्थक खेडेकर, स्वरा दळवी, अनिशा मोरे, आर्यन मोरे, प्रथमेश दळवी, समिक्षा जाधव, अनन्या धोत्रे आदी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

खवटी येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा सत्कार करताना संस्थाध्यक्ष विजय दरेकर, सोबत धनंजय दरेकर व संस्था पदाधिकारी.

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts