loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यपालांसमवेत झालेला सुसंवाद हे माझ्यासाठी मार्गदर्शक ठरेल !- अजय बिरवटकर

खेड : - महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल मा.श्री.सी.पी. राधाकृष्णन यांचे समवेत दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी स्वागत समारंभास राजभवन मुंबई येथे उपस्थित राहण्याचा योग आला. मा. राज्यपाल महोदयांनी आपल्या अमूल्य वेळातून माझ्यासारख्या सेवकाजवळ केलेला सुसंवाद माझ्या भावी कार्यास मार्गदर्शक ठरेल.असे महाराष्ट्रीय यादव चारिटीचे अध्यक्ष अजय शांताराम बिरवटकर यांनी अभिमानाने सांगितले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ते पुढे म्हणाले ., मा.राज्यपाल महोदय यांनी महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट या आपल्या संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर स्नेहज्योती अंध विद्यालयबाबत माहिती दिली. सामाजिक जीवनात आपल्या सारखे तरुण चांगले योगदान देत आहेत याचा अभिमान वाटतो असे गौरोउदगार काढले व मला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राज्यपाल महोदयांनी आपल्या अमूल्य वेळातून माझ्या सारख्या सेवका जवळ केलेला हा सुसंवाद माझ्या भावी कार्यास मला मार्गदर्शक ठरेल. असे श्री. बिरवटकर यांनी सांगितले आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts