loader
Breaking News
Breaking News
Foto

बोडदे टेंबवाडी येथे एसटी बसच्या धडकेने सांबराचा मृत्यू

दोडामार्ग (प्रतिनिधी) : बोडदे ते खोक्रल मुख्य रस्त्यावर टेंबवाडी येथे जंगली नर सांबराचा मांगेली-दोडामार्ग एसटी बस क्रमांक एम. एच. ०७ -७५०० ला धडकून मृत्यू झाला. धडकेनंतर सांबर पंधरा फूट फरफटत गेले. एसटी बसच्या पुढील टायरमध्ये शिंगे अडकल्याने एका बाजूने एसटी बस पलटी झाली असती पण चालकाने बस मागे घेऊन अडकलेल्या सांबराला ग्रामस्थांच्या मदतीने बाजूला केले. चालकाने प्रसंगावधान दाखवले. अर्जंट ब्रेक लावला असता तर प्रवासी, शाळकरी मुले यांना इजा झाली असती पण कुणाला काही झाले नाही. घटनेची माहिती पोलिस पाटील यांनी वनविभाग, पोलीस यांना दिल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. नर सांबराने रस्ता पार करून पलीकडे जाण्यासाठी गटारातून उडी मारली तोच एसटी बसला धडकला व यातच त्याचा मृत्यू झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts