loader
Breaking News
Breaking News
Foto

मौनी अमावस्येनिमित्त १० कोटी लोक प्रयागराजमध्ये, मुख्य संगमावर स्नान करण्यासाठी गर्दी लोटली

प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळात १० कोटी पेक्षा अधिक लोक उपस्थित आहेत. मंगळवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास मौनी अमावस्येनिमित्त मुख्य संगमावर गंगास्नान करण्यासाठी अचानक लाखों लोकांची गर्दी उसळली. त्यावेळी वाटेत असलेले बॅरिकेट तोडून संगमावर स्नानासाठी जाण्याचा प्रयत्न लोकांनी केला. वाढत्या दबावामुळे गर्दी वाढत गेली आणि झोपलेल्या लोकांवर पहिल्या फळीतील लोक पडले. त्यामुळे पाठीमागून लोक एकावर एक पडून चेंगराचेंगरी झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उत्तरप्रदेशचे योगी सरकार १० कोटी लोकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा व सुरक्षितता राखण्याचे काम करीत आहेत. इतक्या मोठ्या संख्येत आलेल्या १० कोटी लोकांना आवरणे मोठे आव्हानच ठरले आहे. त्यामुळे आता भारतीय सैनिकांची मदत घेण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts