loader
Breaking News
Breaking News
Foto

वाढीव एसटी दर विरोधात रोहा शिवसेनेकडून महामंडळाला निवेदन

धावीर रोड (वार्ताहर) दिवसेंदिवस वाढती महागाई आणि बेरोजगारीमुळे सर्वसामान्य जनता कमालीचा त्रस्त झाली आहे. त्यात नेहमीच प्रवास करणार्‍या सामान्य नागरिकांना खाजगी प्रवास परवडणारे नाही. सर्वसामान्य नागरिकांचा जीवन एसटी वर अवलंबून आहे असे असताना राज्यातील महायुती सरकारने एसटीच्या दरात 15% वाढ केली आहे. हि दर वाढ सामान्य वर्गाला न परवडणारा आहे. या भाव वाढीमुळे वाढती महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या खिशावर आणखी ताण पडणार आहे. सर्वसामान्यांचा आधार असलेल्या एसटी बसच्या तिकीट दरामध्ये राज्यातील महायुती सरकारने भरमसाठ वाढ केल्याने जण माणसातून कमालीचा संताप व्यक्त होत आहे. वाढीव दर भाव तात्काळ मागे घेण्यात यावी अशी मागणी शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. राज्य सरकारने एसटी दर वाढीचा निर्णय घेतल्यानंतर रोजी शिवसेना पक्ष श्रेष्ठी यांच्या आदेशानुसार तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या नेतृत्वाखाली रोहा एसटी महामंडळ बस स्टँड येथे आंदोलन करून अधिकार्‍यांना भाव वाढ रद्द करणे संदर्भात निवेदन देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उप तालुका प्रमुख महादेव साळवी, शहर प्रमुख दीपक तेंडुलकर, तालुका महिला संघटक नीता हजारे, शहर महिला संघटक समीक्षा बामणे, युवासेनेचे राजेश काफरे, युवा सेना तालुका प्रमुख राम महाडिक, यतीन धुमाळ, अनिश शिंदे, दुर्गेश नाडकरी, निलेश वारंगे, मनोज शेडगे, प्रीतम देशमुख, जेष्ठ शिवसैनिक भाडेकर, आदित्य कोंडाळकर, समीर दाखवे, बिलाल मोरबेकर, यतीन धुमाळ, अपेंद्र सावंत, सौ. रोहिणी गौसावी, दीक्षिता वाघमारे आदि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे... दर वाढ रद्द झालीच पाहिजे.., परिवहन मंत्र्याचा करायचा काय.. खाली डोकं वर पाय..., शिवसेना झिंदाबाद,.. अशा घोषणा देत शिवसैनिकांनी आपला निषेध व्यक्त केला. एसटी दर वाढीचे निवेदन देत असताना शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारचे आंदोलन, एस टी महामंडळ, किंवा प्रवाशी वर्गाला त्रास होईल असे कृत्य न करताना शांततेत निवेदन देण्यात आले आहे. एस टी महामंडळाच्यावरिष्ठ अधिकारी यांच्याकडे आमचे निवेदन सादर व्हावे व त्यांनी या विषयी गांभिर्यपूर्वक लक्ष देऊन तातडीने भाव वाढ रद्द करावे अशी मागणी तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts