loader
Breaking News
Breaking News
Foto

छ.शिवाजी महाराज हायस्कूल, खोपी हिरक महोत्सव उत्साहाने साजरा

खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये असलेल्या मौ. खोपी पंचक्रोशीमध्ये शैक्षणिक क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवलेल्या छ.शिवाजी महाराज विद्या प्रसारक मंडळ मुंबई संचलीत छ.शिवाजी महाराज हायस्कुल आणि ज्यु.कॉलेज, खोपी या विद्यालयामध्ये संस्थेचा व प्रशालेचा हिरक महोत्सव उत्साही, आनंदी वातावरणामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. समारंभाला माजी संस्था संस्थापक सदस्य, कर्मचारी, विद्यार्थी यांचा सन्मान आणि ऋणनिर्देश सोहळा त्याचबरोबर विद्याथ्यार्ंचे विविध कलागुणदर्शन हा विशष कार्यक्रम ‘स्नेहगंध’ आयोजित करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संस्थेचे अध्यक्ष वसंतराव सखारामराव भोसले यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून मागील ६० वर्षांचा संस्थेच्या कार्याचा अहवाल सादर केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी जिल्हा सत्र न्यायधीश श्रीधर महादेवराव भोसले उपस्थित होते. त्याचप्रमाणे एस्कॉन प्रो.फांऊडेशन प्रा.लि.पुणेचे संचालक निलेश चव्हाण, उद्योजक तथा संस्थेचे सल्लागार सुरेशराव सखारामराव भोसले, खेड तालुका गटशिक्षणाधिकारी विजय बाईत, संस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत भोसले, सरचिटणीस राजन भोसले, चेअरमन अंकुश भोसले, मुख्याध्यापिका सौ.सविता मोरे, व्हा.चेअरमन अरविंद सुर्वे, सर्व कार्यकारीणी व शाळा समिती सदस्य तसेच शाळेचे आजी माजी विद्यार्थी, कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी जिल्हा व सत्र न्यायधीश श्रीधर भोसले यांनी सर्व प्रथम संस्थेने आपली यशस्वी वाटचाल अतिशय उल्लेखनिय कार्य करीत ६० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष, संचालक कर्मचारी शिक्षकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, आपण या शाळेची पहाणी करीत असताना शाळेचे व्यवस्थापन अतिशय चांगल्या प्रकारे केले जात असल्याचे आढळून आले. मा.उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायधीशांना शाळांची पहाणी करण्यास सांगितले होते. अनेक शाळांची पहाणी केली परंतु खोपी येथील शाळेची तुलना अन्य शाळांबरोबर होऊ शकणार नाही एवढे चांगले व्यवस्थापन असून याचे सर्व श्रेय संस्थेच्या संचालकांचे असल्याचे त्यांनी सांगितले. अलिकडे पालक आपल्या पाल्यांना शहरांतील मोठ्या शाळांतून शिक्षणा करीता पाठवित आहेंत, परंतु त्यामुळे आपल्या गावांकडील प्रार्थमिक शाळांतून पटसंख्या कमी होत असल्याचे दिसून येते. याचा पालकांनी विचार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगताना आपले वडील भारतीय सैन्य दलामध्ये उच्च पदावर कार्यरत होते परंतु तरीही आपले शिक्षण म्युनिसिपालटीच्या शाळेतून झाले. त्या शाळांमधून देखील चांगले शिक्षण मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीधर भोसले यांनी आपल्या भाषणामध्ये मोबाईलमुळे कुटुंब व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे सांगताना त्यामुळे वाचन संस्कृती नष्ट होत असल्याचे दिसून येत असल्याचे ते म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts