loader
Breaking News
Breaking News
Foto

आय.सी.एस. मध्ये श्री.मंदार ओक यांचे व्याख्यान संपन्न

खेड - येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन आणि चाणक्य नीति' या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते श्री. मंदार ओक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सुरुवातीस महाविद्यालयाकडून यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आय.टी. विभागाचे संचालक श्री. अमोलभाई बुटाला, श्री.उत्तम कुमार जैन, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो.डॉ.अनिता आवटी, एम.बी.ए.चे डायरेक्टर डॉ. प्रसाद भणगे, आय.टी. विभागाचे समन्वयक डॉ.सचिन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपल्या ओघवत्या शैलीत, इतिहासाचे विविध पुरावे, दाखले देत मंदार ओक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनावर प्रकाश टाकला व या व्यवस्थापनाची चाणक्य नीतिशी जोड देऊन शिवाजी महाराजांच्या भूमिकेचे, व्यवस्थापनाचे विविध पदर श्रोत्यांसमोर उलगडवून दाखवले.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

अफजलखानाचा वध हा मुख्य धागा पकडून त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापनाचे विविध कंगोरे दाखवत एकूण स्वराज्य उभारणीत छत्रपती शिवाजी महाराज कसे यशस्वी झाले? हे त्यांनी सविस्तर सांगितले. या व्याख्याना दरम्यान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंत्रमुग्ध होऊन या व्याख्यानाचा आस्वाद घेतला. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.सचिन भोसले यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा.अक्षता चव्हाण यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts