loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी येथे डाव्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर

दोडामार्ग (प्रतिनिधी) : साटेली भेडशी भोमवाडी येथे तिलारीच्या डाव्या कालव्याला मोरीच्या खालचे पाईप सरकल्याने पोकळी निर्माण होऊन माती भराव खचून कालव्याला भगदाड पडून परिसरातील शेतकरी बांधव यांचे नुकसान झाले होते. शिवाय कालवा फुटल्याने गोवा राज्यात होणारा पाणी पुरवठा देखील बंद झाला आहे. यामुळे मोठी गैरसोय निर्माण होऊन उन्हाळी पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग यांनी कालवा फुटल्याच्या ठिकाणी युद्धपातळीवर दुरुस्ती कामाला सुरुवात केली आहे. या बाबत कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांना विचारले असता शुक्रवारी किंवा शनिवारी सायंकाळपर्यंत पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी शक्यता वर्तवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तिलारी धरणाच्या डाव्या उजव्या महाराष्ट्र हद्दीतील कालवे याची डागडुजी दुरुस्ती झालेली नाही. कालवे बांधून चाळीस वर्षे झाली आहेत. ते सक्षम करण्यासाठी प्रयत्न झाले नाही. गळती किंवा कालवा फुटणे अशा ठिकाणी दुरुस्ती झाली आहे. पण इतर ठिकाणी काम झाले नाही. राज्य सरकारने जलसंपदा विभाग यांना आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन गोवा राज्यात ज्या प्रमाणे कामे केली. तशीच कामे करावी जेणेकरून कालवे फुटणे याला आळा बसणार आहे. साटेली भेडशी भोमवाडी येथे शुक्रवारी सकाळी कालवा फुटला होता. सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी कालव्याच्या माती भरावाखाली मोरी होती. त्या खालचे सिमेंट पाईप सुटल्याने कालवा फुटला होता. याची दुरुस्ती वरच्या बाजूने केली होती. पण खालचा भाग तसाच होता ती दुरुस्ती विचाराधन होती. पण गोवा राज्यात पाणी मागणी लक्षात घेऊन ताडपत्री आवरण घालून पाणी पुरवठा सुरू होता.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts