loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रशासनाने कोंबड्या नष्ट केल्या,बर्ड फ्ल्यू चा धोका माणसाला असून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

राज्यात बर्ड फ्लूने शिरकाव केल्यानंतर आता प्रशासन सतर्क झाले आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बॉयलर कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले होते. याची तपासणी केली असता, नमुन्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर प्रशासनाने येथील बाधित कोंबड्या आणि त्यांची अंडी सुरक्षितपणे नष्ट करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. तसेच पोल्ट्री फार्म निर्जंतुकीकरण करण्याचे आदेशही दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्यात अनेक जिल्ह्यात बर्ड फिल्म ने थैमान घातले आहे. त्यामुळे जाणकार चिकन खाण्यास मनाई करत आहेत. राज्यातील अनेक भागात हा बर्ड फ्लू पसरला आहे. कोकणात येणाऱ्या इंग्लिश कोंबड्या देखील या आजाराने प्रभावित असू शकतात अशी शक्यता गृहीत धरून काही दिवस चिकन पासून दूर राहण्याचा विचार सुज्ञ नागरिक करताना दिसत आहेत.बर्ड फ्ल्यू चा धोका माणसाला असून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts