loader
Breaking News
Breaking News
Foto

पानसरे हत्याप्रकरणातील आरोपींना जामीन

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील आरोपींना मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोरेंच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. याप्रकरणात अटक झाल्यापासून आरोपी तुरुंगातच आहेत, खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही, त्यामुळे आरोपींना जामीन मंजूर करत असल्याचे यावेळी कोर्टाने म्हटले. तपासात पाहिजे तशी प्रगती झाली नाही, त्यामुळे आरोपी जामीनासाठी पात्र असल्याचे देखील कोर्टाने म्हटले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात गेल्या सहा वर्षापासून अटकेत असलेल्या सहाही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.न्या यमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आलाय. सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर, अमित बट्टी, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना साल 2018 ते 2019 दरम्यान अटक करण्यात आली होती. मात्र, आता त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts