loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष मंडळ निवे बुद्रुकच्या मुंबईकर चाकरमान्यांचा स्नेह मेळावा उत्साहात ---

मुंबई - श्री सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष मंडळ, निवे बुद्रुक, (ता. संगमेश्‍वर) मधली वाडीचा ९ वा कौटुंबिक स्नेह मेळावा राष्ट्रीय मिल मजदूर संघ कॅम्पस परेल येथे १९ जानेवारी रोजी मोठया उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवडी विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेवक श्री. सचिन पडवळ, सचिव लालबाग राजा, शिवसेना शिवडी विधानसभा संघटक श्री. सुधीर साळवी, शिवडी शाखाप्रमुख, महिला आघाडी सौ. कविता माने, इस्त्रा संस्थेचे डायरेक्टर, महाराष्ट्र राज्य रेशनींग समितीचे मुख्य निमंत्रक, राज्य आयोगाचे मेंबर श्री.गोरख, आ. आव्हाड आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाची सुरवात श्री. सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष मंडळ, मुंबईचे अध्यक्ष, श्री. गुरुनाथ पाल्ये व महिला मंडळाचे अध्यक्ष सौ. दिपाली यशवंत पाल्ये यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. महिलांसाठी हळदीकुंकू आणि विविध गुणदर्शनाचे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महालक्ष्मी ग्रुप शिवडीने मंगळागौरी नृत्य सादर करून सर्व उपस्थितांचे मनोरंजन केले. वाडीमधील शैक्षणिक क्षेत्रातील १०वी, १२वी आणि पदवीधर विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमाला मंडळाचे उपाध्यक्ष श्री. निलेश पाल्ये, सचिव श्री. विजय घडशी, खजिनदार अनिल पाल्ये, सहसचिव श्री. अवधूत पाल्ये, सल्लागार श्री. मनोहर पाल्ये व श्री. लक्ष्मण गोताड. माजी अध्यक्ष श्री. यशवंत पाल्ये, माजी सचिव श्री. अनिल पाल्ये महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. साक्षी पाल्ये, सचिव सौ.अर्चना पाल्ये सहसचिव सौ. गीतांजली पाल्ये खजिनदार सौ. विनिता घडशी, सल्लागार सौ. मनीषा पाल्ये आणि वृषाली पाल्ये उपस्थित होते. मंडळाचे सर्व सभासद आणि सदस्य यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts