loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वरूपानंद पतसंस्थेच्या नववर्ष स्वागत ठेव योजनेचे १० कोटींचे उद्दिष्ट योजनेचे दोन दिवस शिल्लक असतानाच पूर्ण- दीपक पटवर्धन ---

नववर्ष स्वागत ठेव योजनेचा प्रारंभ करताना १० कोटींची नवी डिपॉझिट संकलित करण्याच उद्दिष्ट ठेवून करण्यात आला होता. १ जानेवारी २०२५ पासून सुरू असलेल्या या योजनेला भरभरून प्रतिसाद प्राप्त होत आहे. संस्थेच्या १७ ही शाखांमध्ये ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूका केल्या असून संस्थेने जाहीर केलेले १० कोटींचे उद्दिष्ट या स्वागत ठेव योजनेचे दोन दिवस शिल्लक असतानाच पूर्ण झाले. संस्थेच्या ठेवी ३३८ कोटी ४५ लाख झाल्या असून सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात आज अखेर संस्थेकडे रु. ४३ कोटींच्या नव्या ठेवी संकलित झाल्या. स्वागत ठेव योजनेच नाविण्य म्हणून जाहीर केलेल्या ६ लाखापेक्षा अधिक गुंतवणुकीच्या योजनेला भरभरून प्रतिसाद प्राप्त झाला असून या योजनेत रु. ६ कोटी ठेव जमा झाली. स्वागत ठेव योजनेत १०२२ ठेवखात्यांच्या माध्यमातून ठेव जमा झाली असून अजूनही या ठेव योजनेचे दोन दिवस शिल्लक आहेत. या योजनेचा लाभ अधिकाधिक ग्राहक ठेवीदारांनी घ्यावा असे आवाहन दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts