loader
Breaking News
Breaking News
Foto

आरवली समुद्रात कर्नाटक मलपी येथील नौका मत्स्य विभागाने पकडली ---

मालवण(प्रतिनिधी)- सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने कारवाई करत वेंगुर्ला आरवली समोरील समुद्रात १६ वाव पाण्यात अनधिकृतरित्या मासेमारी करणारी मलपी कर्नाटक येथील हनुमा सानिध्य ही हायस्पीड नौका ताब्यात घेतली आहे. आरवली वेंगुर्ला समोर १६ वाव पाण्यात मत्स्य व्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी मुरारी भालेकर सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी (परवाना अधिकारी वेंगुर्ला) काल मंगळवारी रात्री आपल्या पथकासह नियमित गस्त घालत असताना रात्री ११:३० चा सुमारास कर्नाटक राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली जलशिला सुवर्णा कोटियान (रा. कोदावूर ता. मलपे, राज्य कर्नाटक) यांची नौका हनुमा सानिध्य (नों. क्र.- इंडीया- केएA- २-एमएम्- ५२१७) महाराष्ट्रातील जलधीक्षेत्रात आरवली वेंगुर्ला समोर अनधिकृतरित्या मासेमारी करत असताना दिसून आल्याने ही नौका भालेकर यांच्या पथकाने पकडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या नौकेवर नौका तांडेलसह इतर खलाशी होते. सदर नौका जप्त करून वेंगुर्ला बंदरात ठेवण्यात आली आहे आणि त्यावर असणार्‍या मासळीचा लिलाव करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. अंमलबजावणी अधिकारी श्री मुरारी भालेकर, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी (परवाना अधिकारी वेंगुर्ला) यांनी पोलीस कर्मचारी श्री आळवेकर तसेच दीपेश मायबा, मिमोह जाधव व सागरी सुरक्षा पर्यवेक्षक सागर परब व राजेश कुबल, स्वप्निल सावजी, निलेश पाणजी, प्रणित मुणगेकर, हर्षद टाक्कर, भगवान तांडेल, चंद्रकांत कुबल, सागरी सुरक्षा रक्षक यांच्या सहकार्याने सदर कारवाई करण्यात आली. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात ठेवण्यात येणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts