loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगडमधील मॉडेल कॉलेज कर्मचार्‍यांचे उपोषण ३ दिवसानंतर स्थगित

संगलट-खेड (प्रतिनिधी) : सेवेत कायम करण्याच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणीसाठी प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषणास बसलेल्या आंबडवे येथील मॉडेल कॉलेजच्या कर्मचार्‍यांनी सुरू ठेवलेले उपोषण अखेर तीन दिवसांनी मागे घेतले. मुंबई येथे कर्मचार्‍यांच्यावतीने गावातील जागृती मंडळाचे शिष्ठमंडळ व मुंबई विद्यापीठाचे अधिकारी यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाविद्यालयास जमीन देणगी देणार्‍या शिक्षकेतर कर्मचार्‍यांना विद्यापीठाने नियमानुसार सेवेत कायम न करता इतरही मागण्या प्रलंबित ठेवल्याने देणगीदार जमीन मालक सुशांत सकपाळ, अमोल सकपाळ, नीलेश सकपाळ, उदय जाखल, सुजाता सकपाळ, विनित सकपाळ, प्रिती तांबे, प्रफुल्ल तांबे, राजेंद्र राऊत, रमेश सकपाळ, सौरव सकपाळ, प्रशांत सकपाळ, अक्षय सकपाळ हे आंबडवे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे उपोषणास बसले होते. मात्र शिष्टमंडळाच्या मुंबई विद्यापीठाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर व आश्वासनपूर्तीच्या लेखी पत्रानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts