loader
Breaking News
Breaking News
Foto

किल्लेमाची गावात गुरांचा गोठा जळून खाक

खेड (दिलीप देवळेकर) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील घेरा पालगड किल्लेमाची गावामध्ये शॉर्टसर्किटमुळे दोन गुरांच्या गोठ्याला मोठ्या प्रमाणात आग लागली. त्यामध्ये तीन गुरांना वाचवण्यात यश आलेले मात्र एक बैल गंभीररित्या भाजून जखमी झाला. ज्या ठिकाणी ही आग लागली त्याच ठिकाणी पेंड्यांच्या गंजा म्हणजेच उडव्या जळून गेल्या आहेत. हजारो रुपयांचे नुकसान झालेले आहे. ज्या ठिकाणी गुरांचा गोठा आहे त्याच नजीक ग्रामस्थांची घरे देखील आहेत. खेड नगरपालिका अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने गोठ्यांना लागलेली आग विझवण्यात आली तर घरांच्या दिशेने जाणारी आग सुद्धा विझवण्यात आली. किल्ले माची या ठिकाणी आग लागल्याचे समजताच खेड नगरपालिका अग्निशामक दलाचे जवान फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, जयेश पवार, प्रणय रसाळ, गजानन जाधव यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन मोठी हानी होण्यापासून वाचवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts