loader
Breaking News
Breaking News
Foto

अजूनही डीजीटल युगात हळदीकुंकू कार्यक्रमाचे महत्त्व काय?

म्हसळा (वार्ताहर) : आजच्या डिजिटल युगात पारंपरिक सणांना आधुनिकतेची झालर चढली असली तरी, अजूनही स्रियांनी अनेक पारंपरिक सणांचे महत्त्व कायम ठेवले आहे. त्यापैकी एक म्हणजे सण मकरसंक्रांती. संक्रांत म्हणजे स्रियांचा सण, हळदीकुंकू कार्यक्रम आणि वाणांची लयलूट. काळानुसार वाणांच्या वस्तू बदलल्या असल्या तरी, अजूनही हळदीकुंकवाचे महत्त्व मात्र कायम अबाधित असल्याचे दिसून येत आहे. म्हसळा शहरातील पीएमश्री राजीप शाळा नं १ मध्ये पालक-शिक्षक यांच्यातील संबंध दृढ होण्यासाठी आयोजित केलेला महिला मेळावा विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी महिलासाठी हळदीकुंकू व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक माशाळे यांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व आणी मराठी भाषेचा गौरव यावर व्याख्यान दिले. तसेच महिलांसाठी विवीध खेळांचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी मुख्याध्यापक सुमित्रा खेडेकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष स्नेहल निजामपूरकर, निधी दर्गे, राविशा सोनावणे, राखी बिचुकले, वैशाली करडे, निशा चव्हाण, कोमल वसावे, दिलीप शिंदे, मिलिंद मुंढे, श्रीधर उमदी, जयश्री गायकवाड उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts