loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री सोमेश्वर चषक २०२५ उत्साहात संपन्न

खेड (दिलीप देवळेकर) : शिव शक्ती बाल मित्र मंडळ बहिरवली- भागणे वाडी संलग्न श्री सोमेश्वर क्रिकेट संघ आयोजित श्री सोमेश्वर चषक-२०२५ पर्व ३ रे अत्यंत दिमाखात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. किंग्ज मैदान, उसरघर आगांसन दिवा येथे यु ट्यूब लाईव्ह अत्यंत उत्साहपूर्ण खेळीमेळीच्या वातावरणात दिमाखदारपणे ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेसाठी खास मंडणगड तालुक्यातील नावाजलेले पंच निलेश धामणे आणि विजय यादव यांनी पंचांचे काम उत्कृष्टरीत्या पार पाडले. सदर स्पर्धेत समाविष्ट सर्व संघांचे खेळाडू आणि क्रिकेट संघांनी उत्कृष्ट खेळी केली. मंडळाच्या वतीने समाविष्ट सर्व संघांचे खूप खूप अभिनंदन करण्यात आले. तसेच मंडळाचे हितचिंतक, देणगीदार यांचेही मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री सोमेश्वर चषक २०२५ यावर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो तुंबाड शिंदेवाडी संघ, द्वितीय क्रमांकावर पन्हाळजे रामवाडी या संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. अनुक्रमे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले ते बहिरवली लाडवाडी संघ आणि चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले ते एमटूकेसीसी तळघर संघ. स्पर्धेमध्ये समाविष्ट सर्व संघांनी उत्कृष्ट खेळी आणि सहभाग नोंदवून शिव शक्ती बाल मित्र मंडळ बहिरवली-भागणे वाडी संलग्न श्री सोमेश्वर क्रिकेट संघास मोलाचे सहकार्य केले. या क्रिकेटच्या महासंग्रामाची सुरुवात श्री गणेश पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रगीत, वंदेमातरम या घोषणेने शिवगर्जना देऊन करण्यात आली. या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी मंडळाच्या सर्व सभासदांमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले.

टाइम्स स्पेशल

प्रत्येक मॅचचा टॉस हा महिला वर्ग यांच्याकडून उडवला जात होता हा एक वेगळा संदेश या मंडळाने समाजापुढे ठेवला आहे. संपूर्ण महासंग्रामाचे समालोचन मनीष लोंढे यांनी अतिशय सुंदररीत्या पार पाडले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मुंबई अध्यक्ष प्रकाश दादा भागणे, सेक्रेटरी पांडूरंग दादा भागणे, खजिनदार दिनेश दादा भागणे, महेंद्र दादा भागणे, गणपत दादा राळे, नामदेव दादा भागणे, लक्ष्मण दादा राऊत, महेश दादा जावळे, महेश दादा भागणे ऊर्फ (पॉंटिंग), चंद्रकांत दादा भागणे ऊर्फ (चांद), पुणे मंडळ अध्यक्ष राज दादा भागणे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर दादा भागणे, एकनाथ बांद्रे, रविंद्र शिगवण आणि मंडळाचे सर्व सन्मानिय पदाधिकारी, सभासद यांचेही मोठे सहकार्य आणि योगदान या स्पर्धेला लाभले. शिवशक्ती बाल मित्र मंडळाचे कार्यकर्ते, सभासद, महिला पदाधिकारी व महिलावर्ग यांच्या प्रचंड मेहनतीने आणि उत्कृष्ट नियोजनातून ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts