loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड बाजारपेठेमध्ये वाहतुक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

संगलट-खेड (प्रतिनिधी) : खेड शहरातील बाजारपेठेमध्ये एक दिशा मार्ग असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने उभी करण्यात येत असल्याने नागरिकांची चालताना मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. या रस्त्यावरून चालताना अनेक वयोवृद्ध लोक असून जागोजागी वाहने उभे करून ठेवल्याने नागरिकांना रस्ता शोधण्याची वेळ येत असते. अनेक वेळेला गटारातून उतरून देखील आपली वाट काढत असतात. सदर या ठिकाणी मोठमोठे ट्रक, टेम्पो, रिक्षा उभ्या करून ठेवल्याने लोकांची वारंवार कोंडी होत आहे. याबाबत प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. तसेच अनेक व्यापारी, फळ विक्रेते यांनी रस्त्याच्या ठिकाणी आपला व्यवसाय मांडल्याने वाहनांना व पादचार्‍यांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहेत. तरी याबाबत प्रशासनाने दखल घेऊन कायद्याची पायमल्ली करणार्‍यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts