दापोली (शशिकांत राऊत) : मी माझ्या कोकणचा पहिला विचार करतो. अधिवेशन आले की मी माझ्या कोकणसाठी काय मागायचं? मला एखादी योजना करायची असेल तर यातून कोकणसाठी काय देता येईल? याचा पहिला विचार करतो. सातत्याने माझा कोकण विकसित झाला पाहिजे याचाच विचार करतो कारण कोकण ही रत्नांची खाण आहे. कोकणात विद्वत्ता आहे. कोकणातील डॉक्टर अमेरीकेत जातार्तें परदेशात जाऊन सेवा देत असतात. तज्ञ लोक, शास्त्रज्ञ आपल्या कोकणातून जातात. विचारवंत, साहित्यिक, जे जे कोणी थोर पुरुष झाले ते अधिक कोकणातीलच आहेत. अशी कितीतरी नावे सांगता येतील. कोकणातील त्या ठिकाणी विरासत आहे. कोकण एवढे वैभव संपन्न आहे त्यामुळे वैभव संपन्न असलेल्या कोकणला आमच्या सारख्या राजकारणी लोकांनी पुढे नेण्याचे प्रमुख काम केले पाहिजे. अशा प्रकारचा कोकण विकासाच्या आपुलकीचा सल्ला कोकण सुपूत्र मुंबै बँकेचे अध्यक्ष आम.प्रविण दरेकर यांनी वेळवी येथे बोलताना कोकणातील राजकारण्यांना दिला.
दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आम.सुर्यकांत दळवी हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या श्रद्धा शिक्षण संस्था दापोली व वेळवी पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला २५ वर्ष पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ती वेळवी येथील सोहळा कार्यक्रमात विशेष निमंत्रित प्रमुख मार्गदर्शक अतिथी म्हणून आम.प्रविण दरेकर बोलत होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आम. सूर्यकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला यावेळी दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, हिंदुस्थान पेट्रोलियमचे सेल्स ऑफीसर रोहित कटियार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे, राजकुमार निगुडकर, संतोष घोसाळकर, स्मिता जावकर, उदय जावकर, योगेश ऊर्फ गुंडया सुर्वे, अजय दळवी, संस्था सचिव श्रद्धा बेलोसे, शांताराम पवार, नरेंद्र करमरकर, राजेश दरेकर, धनजंय शिरसाठ, रेश्मा झगडे, रत्नागिरी जिल्हा शांताराम जाधव, कोषाध्यक्ष बबन शेडगे, संचालिका स्मिता दळवी, श्वेता दळवी, अजिंक्य दळवी, पोलीस पाटील रेवा झगडे, तंटामुक्त अध्यक्ष धोंडू चौगुले, नगरसेविका जया साळवी, संतोष शिंदे, मधुकर मोरे, शिक्षकेतर संघटनेचे अमोल जाधव, रविंद्र गिम्हवणेकर, महेश कदम, नरेश दळवी, कमलेश दळवी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ते बोलताना म्हणाले की, एखादी संस्था स्थापन करणे सोपी गोष्ट असते परंतु सलग २५ वर्षे त्या संस्थेचा प्रवास अव्याहतपणे सुरू ठेवणे तसं अवघड काम असते. माणसाचं वय वाढतं तसं तो माणूस म्हातारा होत जातो परंतु संस्थेच्या बाबतीत मात्र नेमके याउलट असतं. संस्थेला जेवढी वर्षे होतात तेवढी ती तरुण होत जाते. माजी आम. सुर्यकांत दळवी यांनी आपल्या परिसरातील विदयार्थी शिक्षित व्हावेत त्यांची शिक्षणाची परवड होवू नये यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी सवार्ंसाठी शाळा सुरू केली हे त्यांनी केलेले सर्वात मोठ भाग्य आणि पुण्याचे काम केले आहे, अशाप्रकारचे गौरोद्गगार त्यांनी काढले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.