loader
Breaking News
Breaking News
Foto

साखळोली नं.१ शाळेला टीव्ही संच देणगी

दापोली (वार्ताहर) :- तालुक्यातील जि. प. शाळा साखळोली नं.१ या शाळेला गावच्या ग्रामपंचायतकडून ४३ इंच स्मार्ट टी. व्ही. संच सरपंच दिक्षा तांबे, उपसरपंच दिनेश जाधव, ग्राम पंचायत अधिकारी अविनाश माळशिकारे यांचे हस्ते मुख्याध्यापक संजय मेहता यांचेकडे नुकताच सुपुर्द करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांचे अध्ययन सुकर होण्यासाठी तसेच चालू घडामोडीं विषयक अद्ययावत ज्ञान मिळवण्यासाठी सदर टी.व्ही. चा चांगला उपयोग होऊ शकेल असे सरपंच दिक्षा तांबे यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यवस्थापन समिती अध्यक्षा तथा ग्रा.प. सदस्य वैभवी गोरीवले, रामकृष्ण (बंडू )बर्वे, मनोज जाधव, सुप्रिया लोंढे, रेश्मा गौरत यांचेसह मुख्याध्यापक संजय मेहता, समीर ठसाळ, संजय चोरमले, सुरेश पाटील आदी शिक्षक, कर्मचारी महेश तांबे उपस्थित होते. यावेळी दुरदर्शन संचाचा सदुपयोग होईल असे मुख्याध्यापक संजय मेहता यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts