loader
Breaking News
Breaking News
Foto

पालू लांजा येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घर बेचिराख

लांजा (संजय साळवी) : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घर बेचिराख होण्याची दुर्दैवी घटना ही तालुक्यातील पालु-चिंचुर्टी धावडेवाडी येथे बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. घर बंद असल्याने जिवितहानी झाली नाही. मात्र घरातील सर्व साहित्य, कपडालत्ता यांची राखरांगोळी झाली. या घटनेत सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुक्यातील पूर्व भागात व दुर्गम भागात असलेल्या पालु - चिंचुर्टी धावडेवाडी येथील प्रकाश रघुनाथ धावडे यांचे घर आहे. प्रकाश धावडे यांचे सर्व कुटुंब हे नोकरी व्यवसायाचे निमित्ताने मुंबईत राहतात. त्यामुळे घर बंद असते. काल बुधवारी २९ जानेवारी रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास आग लागली. हा....हा... म्हणता आगीने रौद्ररूप धारण केले. रात्री अचानक घराला आग लागल्यानंतर एकच हाहाकार उडाला. प्रकाश धावडे यांच्या घराशेजारी अन्य घरे असल्याने सर्व ग्रामस्थांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केले असल्याने हे या घटनेत घर पूर्णपणे बेचिराख झाले. घरातील भांडीकुंडी, कपडेलत्ता, कपाट तसेच अन्य सामान व साहित्याची अक्षरशः राखरांगोळी झाली.

टाइम्स स्पेशल

घराला आग लागल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलीस पाटील तसेच तहसीलदार यांना दिली. त्यानंतर राजापूर नगरपरिषदेचा अग्निशमन बंब मागविण्यात आला. मात्र रात्रीची वेळ असल्याने आणि चिंचुर्टी हा दुर्गम भाग असल्याने बंब पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. अग्निशमन बंब पहाटे घटनास्थळी दाखल झाला तोपर्यंत आगीत पूर्णपणे घर हे बेचिराख झाले होते.दरम्यान, संपूर्ण घर या आगीत भस्मसात झाले आहे. या आगीत घरमालक प्रकाश धावडे यांचे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg