loader
Breaking News
Breaking News
Foto

एसटीच्या भाडेवाढ विरोधात उबाठाच्यावतीने खेड बस स्थानकासमोर आंदोलन

खेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या भाडेवाढ विरोधात शासनाने जाहीर केलेल्या अन्यायकारक एसटी प्रवासी भाडे वाढीच्या निषेधार्थ, ही भाडेवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हाप्रमुख दापोली विधानसभा आमदार संजयराव कदम यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने खेड मध्यवर्ती बस स्थानकासमोर आंदोलन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एसटी महामंडळाने नुकताच १५ % भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या भाडेवाढीमुळे मजूर, विद्यार्थी, शेतकरी आणि गरीब कुटुंबावर याचा थेट परिणाम होणार आहे. त्यांना महिन्याला अधिकचा खर्च सहन करावा लागणार आहे. अगोदरच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला एसटी भाडेवाढ करून वेठीस धरण्याचे काम राज्य सरकार करत आहे. सरकार विविध कारणे सांगून भाडेवाढ करत आहे, पण चांगल्या व स्वच्छ एसटी पुरवणेसह प्रवाशांना विनात्रास आणि वेळेत पोचवण्यासाठी घ्यावयाची योग्य ती दक्षता घेतली जात नाही. राज्य सरकारने सर्वसामान्य लोकांच्या भावनांची कदर करावी व एसटी भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

या आंदोलनासाठी खेड जिल्हा सरचिटणीस जिल्हा परीषद अध्यक्ष शंकरराव कांगणे, उप जिल्हा प्रमुख विजयराव जाधव, तालुकाप्रमुख दत्ताराम भिलारे, उप तालुकाप्रमुख सतिश बेलोसे, उप तालुकाप्रमुख संजय कदम, जेष्ठ शिवसैनिक विष्णु कदम, शहरप्रमुख शेखर पाटणे, खेड नगरपरिषद गटनेते व नगरसेवक बाळ शेठ खेडेकर, उप शहरप्रमुख राजन निर्मळ, नगरसेवक अकुंश विचारे, नारायण भोसले, सरपंचधोंडु सालप, विभाग प्रमुख सचिन खेडेकर, शहर संघटिका सौ.माधवी बेर्डे, सौ.सोनल पाटणे, सुवर्णा सदरे, सीमा शिंदे, भरणे विभाग प्रमुख अकुंश कदम, आंबये शाखा प्रमुख मंगेश सकपाळ, चाकळे शाखा प्रमुख संजय चव्हाण, साखरोली शाखा प्रमुख अनिल साटले, तळे शाखाप्रमुख लक्ष्मण घाग, अनिल मोरे, श्री.कदम, सचिन सकपाळ, मंदार शिर्के, स्वप्निल पाटील, जीवन कडु, विभाग संघटक, विभाग समन्वयक, उपविभागप्रमुख, शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख, बुथ प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना पदाधिकारी व प्रवाशी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts