loader
Breaking News
Breaking News
Foto

कोतवली, आयनीत हजारो किलोची मासळी जाळ्यात

खेड (प्रतिनिधी) :- करंबवणे खाडीत लोटेतील प्रदूषित पाणी ज्या ठिकाणी सोडले जाते त्या दिवा बेट परिसरातील कोतवलीत हजार किलो, तर आयनीमध्ये तब्बल सतराशे किलो मासे मच्छिमारांना मिळाले आहेत. २५ वर्षात प्रथमच मोठ्या प्रमाणात मासे सापडल्याने खाडीपट्‌ट्यातील मच्छीमार आनंदात आहे. करंबवणे खाडीत सक्शन पंपाचा धुडगूस थांबल्याने आणि लोटेतील प्रदूषण कमी झाल्याने चांगला परिणाम खाडीवर झाल्याचे दिसून येत आहे. खाडीत दिवा बेट परिसरात मोठ्या प्रमाणात मासे मिळतात. मात्र याच ठिकाणी लोटे सीईटीपीतून रासायनिक सांडपाणी आणून सोडले जाते. याच ठिकाणी तेथे गेल्या दोन वर्षापासून अनधिकृतपणे पंधरा ते वीस सक्शन पंप वाळू उत्खनन करीत होते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून हे पंप बंद करण्यात आले आहेत. याच दिवा बेट परिसरात सध्या स्थानिक मच्छीमार पारंपारिक जाळे लावून मासळी पकडत आहेत. होड्यांच्या होड्या भरून मासळी किनारी आणली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये मांगण, बांण शिंगटी, अणू, मुशी, खरबा, आदी मासळीसहं काही थोडी-अधिक प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची मासळी मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून लोटेतील सीईटीपीमध्ये फार मोठे बदल झाले. प्रकल्पाचे विस्तारीकरणाबरोबरच प्रदूषण नियंत्रणाच्यादृष्टीने आवश्यक ती उपाययोजना केली गेली. या खाडीत १९९७ मध्ये झालेल्या लोटेतील रासायनिक प्रदूषणानंतर या खाडीची पूरती वाताहात झाली. प्रदूषणाविरोधात दाभोळखाडी संघर्ष समितीच्या माध्यमातून असंख्य आंदोलने करण्यात आली. त्यामुळे त्याचा चांगला परिणाम हळूहळू खाडीवर होऊ लागला. आता त्याच्या जोडीलाच खाडीत वाळू उपसा करणारे सक्शन पंप बंद करण्यात आले आहे. एकूणच याचा एकत्रित परिणाम या खाडीवर झालेला दिसनू येत आहे. ज्याप्रकारे मासळी मिळत आहे ते पहाता मच्छीमारही आश्चर्यचकीत झाले आहेत. खाडीत दोन-तीन किलोचे मासे मिळत आहेत. माशांचे प्रमाण अधिक असल्याने घाऊक बाजारात विक्री केली जात आहे. यामध्ये तीनशे रूपये किलोचे मासे ७० रूपये किलोनेही देण्याची वेळ आली आहे. सध्यस्थितीत दिवा बेट परिसर, आयनी, कोतवली आदी भागात लावल्या जाणार्‍या मासेमारी वाणामध्ये ही मासळी सापडत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts