loader
Breaking News
Breaking News
Foto

धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी आरोपीस एक वर्षाच्या शिक्षेसह १० लाख ९५ हजाराचा द्रव्यदंड!

खेड (वार्ताहर) : तालुक्यातील फुरुस येथील आरोपी तजम्मुल इस्माईल परकार याला धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी येथील संयुक्त दिवाणी न्यायालय (क. स्तर) चे न्यायाधीश श्री.चव्हाण यांनी दोषी ठरवून एक वर्षाच्या शिक्षेसह १० लाख ९५ हजाराच्या द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत फिर्यादी दिलीप दामोदर दिवटे यांनी ऍड.सुधीर बुटाला यांच्यामार्फत कलम १३८, धनादेश अनादर कायद्यानुसार खटला दाखल केला होता. याकामी ऍड. सुधीर बुटाला, ऍड. समीर शेठ, व ऍड.देवरूखकर यांनी काम पाहिले. आरोपी तजम्मूल इस्माईल परकार यास परक्राम्य संलेख अधिनियमाचे कलम १३८ प्रमाणे दंडनीय अपराधाकरीता भारतीय नागरीक सुरक्षा संहिताचे कलम २७८ (२) नुसार सिध्ददोषी ठरविण्यात येऊन आरोपीला एक वर्षे साध्या कैदेची शिक्षा व १० लाख ९५ हजाराच्या द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts