loader
Breaking News
Breaking News
Foto

मुस्लिम संघटनांच्या माध्यमातून प्रभावीपणे केली जात असलेली समाजसेवा प्रशंसनीय - ना. योगेशदादा कदम---

खेड - मुस्लिम संघटनांच्या माध्यमातून प्रभावीपणे केली जात असलेली समाजसेवा प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार राज्याचे गृह राज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांनी काढले आहेत. ते कोकणी मुस्लीम संघ महिला आघाडी, अल्सफा वेलफेयर फौंडेशन आणि खेड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धा 2025 वेळी बोलत होते. ते पुढे म्हणाले, आपल्या संघटनेच्या प्रचंड मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे दरवर्षी हा उपक्रम अधिकाधिक यशस्वी होत आहे. तरुण पिढीला एकत्रित आणून त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी आपण घेत असलेले प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहेत. याशिवाय, दरवर्षी या कार्यक्रमात नवनवीन उपक्रमांची भर पडत असल्याचे पाहून खूप समाधान वाटते. महिलांची संघटनाही तितकीच मजबूत आहे, आणि त्या प्रत्येक उपक्रमात आपले महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत, याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन !

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत एम. आय. हजवाणी इंग्लिश मीडियम स्कूल खेड - 490 विद्यार्थी, ज्ञानदीप भडगाव - 63 विद्यार्थी, एल. पी. इंग्लिश स्कूल खेड -.75 विद्यार्थी, एसीबी प्ले स्कूल 25 विद्यार्थी, एस. एम. इंग्लिश मीडियम स्कूल - 78 विद्यार्थी, हाजी एसएम मुकादम हायस्कूल - 95 विद्यार्थी, ज्ञानदीप बोरज - 85 विद्यार्थी,एम. आय. बी. गर्ल्स हायस्कूल खेड - 150 विद्यार्थी, एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूल खेड - 560 विद्यार्थी, नवभारत हायस्कूल भरणे - 55 विद्यार्थी, चंदुलाल शेठ हायस्कूल - 115 विद्यार्थी, रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल - 116 विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता.

टाईम्स स्पेशल

फैसल महाडिक यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. यावेळी खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब, शिवसेनेचे शहर प्रमुख कुंदन सातपुते, कोकणी मुस्लिम संघ आणि महिला पदाधिकारी, तसेच अलसफा वेल्फेअर फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. रोडगे व श्रीम. मुक्ता उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg