loader
Breaking News
Breaking News
Foto

एम.आय.बी. गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी पंधरवडा उत्साही वातावरणात संपन्न ---

संगलट(खेड)(इक्बाल जमादार)- खेड शहरातील बज्म-ए-इमदादीयाच्या एम.आय. बी गर्ल्स हायस्कूल एंण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये दि. 14 जानेवारी 2025 ते 28 जानेवारी 2025 दरम्यान मराठी पंधरवड्याचे आयोजन मुख्याध्यापिका श्रीमती. रुबीना कडवईकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेे. त्याची सुरुवात प्रशालेतील इ. 6 वी ची विद्यार्थिनी कुमारी. हनीफा शौकत मोटलेकरच्या कुरआन पठणाने करण्यात आली. स. शिक्षक श्री. विजय मोहिते सरांनी उपस्थितांना मराठी पंधरवड्याचा परिचय करून देताना त्याचे महत्त्व व उद्दिष्टे सांगून राबविण्यात येणार्‍या उपक्रमांचे सविस्तर नियोजन सादर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींमध्ये मराठी भाषेबद्दल आपुलकी व प्रेम निर्माण करण्यासाठी कविता गायन, कथा कथन, कथा लेखन, हस्ताक्षर स्पर्धा, प्रकट वाचन, वक्तृत्व स्पर्धा, शुध्द लेखन, घोषवाक्ये लेखन, निबंध लेखन, शब्दकोडे व चारोळी लेखन इत्यादी स्पर्धा तसेच पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समारोपाच्या कार्यक्रमात उपस्थितींना उपक्रम यशस्वी करण्यासाठी मिळालेल्या सहकार्याबद्दल मोहिते सरांनी सर्वांना धन्यवाद देताना विद्यार्थिनींकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे कौतुक केले. अशाप्रकारे मराठी पंधरवडा अनेक स्पर्धांसह उत्साही वातावरणात संपन्न झाला. नियोजनबद्ध उपक्रम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थिनींनीे विशेष मेहनत घेतली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts