loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्या रत्नागिरीतील श्रीराम मंदिरात सर्व भगिनींसाठी हळदीकुंकू सोहळा

रत्नागिरी (वार्ताहर) : रत्नागिरीतील सुप्रसिध्द श्रीराम मंदिरात उद्या शनि. दि. १ फेब्रु. २०२५ रोजी भगिनींसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी सर्व भगिनींनी आवर्जुन उपस्थित रहावे व देवस्थानच्या हळदीकुंकू समारंभाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. सालाबाद प्रमाणे यावर्षीही श्रीराम मंदिर देवस्थान व श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भगिनींसाठी हा हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा हळदीकुंकू समारंभ सर्व भगिनींसाठी खुला असून तो उद्या शनि. दि. १ फेब्रु. २०२५ रोजी सायं. ५ ते ७ या वेळेत श्रीराम मंदिर सभागृह, श्रीराम मंदिर, श्रीराम आळी, रत्नागिरी येथे संपन्न होईल. या हळदीकुंकू समारंभासाठी सर्व भगिनींनी, युवतींनी व मुलींनी आवर्जुन उपस्थित रहावे आणि हळदीकुंकू समारंभाचा आनंद लुटावा असे आवाहन श्रीराम मंदिर देवस्थान व मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts