loader
Breaking News
Breaking News
Foto

कोंडगे रस्ता वाहतुकीस धोकादायक

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : लांजा तालुक्यातील कोंडगे रस्त्यावर खडी पूर्णपणे उचकटल्यामुळे रस्ता वाहतूकीस धोकादायक झाला असून दुचाकी स्लिप होऊन अपघाताच्या घटना घडत आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम कार्यालय लांजा यांना सरपंच एस.व्ही.कदम यांनी कळविले. संबधित अधिकारी यांनी खडी बाजूला करून घेतो असे सांगितले होते परंतु ८ दिवस होऊनही खडी बाजूला करणेकामी कोणतीही कार्यवाही झाली नाही. कोंडगे कुरंग ग्रामस्थ आणि कोंडगे सरपंच यांचेकडून दुचाकी आणि छोटी वाहने जातील एवढी खडी बाजूला करून घेण्यात आली आहे. संबंधित खाते गंभीर अपघात होण्याची वाट पहात आहे का? असा प्रश्‍न कोंडगे, कुरंग, झर्ये ग्रामस्थ उपस्थित करीत असून याबाबत ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts