loader
Breaking News
Breaking News
Foto

पालगड येथे सलून व जनरल स्टोअर जळून खाक, लाखोंचे नुकसान

दापोली (जितेंद्र गावडे) :- तालुक्यातील पालगड येथील रहिवाशी किरण दळवी यांच्या स्वमालकीच्या सलूनला व जनरल स्टोअरला ३० जानेवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. किरण दळवी हे रात्री नेहमीप्रमाणे आपले सलून बंद करून घरी गेले असता काही वेळातच गावातील एका व्यक्तीने किरण दळवी यांच्या दुकानातून धूर येत असल्याचे किरण दळवी यांना सांगितले. सलून व जनरल स्टोअर घरा जवळच असल्याने किरण दळवी यांनी लागलीच तिकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते. ही घटना गावकर्‍यांना समजताच गावकरी मदतीसाठी धावले. गावातील काही गाडीवाल्यांनी आपल्या गाडीतून लागलीच टाकी भरून पाणी आणले व आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र आगीच्या भयंकर ज्वाला पुढे कुणाचेच काही चालले नाही. अखेर काही वेळातच संपूर्ण दुकानाची राख रांगोळी झाली व होत्याचे नव्हते झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर घटना कळताच दापोलीतून तालुका नाभिक समाजाचे अध्यक्ष मंगेश शिंदे, तालुका सचिव शैलेश चव्हाण, तालुका खजिनदार प्रितम शिंदे, शहर अध्यक्ष योगेश दळवी, माजी अध्यक्ष महेंद्र चव्हाण आदी पदाधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन किरण दळवी व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. या दुर्घटनेमध्ये सलूनचे तसेच लगत असलेल्या जनरल स्टोअरचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. काही दिवसांपूर्वीच किरण दळवी यांनी सलून व्यवसायासाठी लागणारे साहित्य तसेच जनरल स्टोअरचे सामान भरले होते. या आगीमध्ये सलून खुर्च्या, आरसे, गिर्‍हाईक बसण्याचे आसन, इलेक्ट्रिक मशीन, वस्तरा, कैची, फणी, क्रीम व इतर सौंदर्यप्रसाधने तसेच जनरल स्टोअरमधील फ्रीज, पंखे, वीज मीटर तसेच रोख रक्कम, काही महत्वाची कागदपत्रे अशा अनेक गोष्टी जळून खाक झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर दुकानाच्या भिंतीवर बसविण्यात आलेल्या टाईल्स सुद्धा निखळून पडल्या. तर सिमेंट पत्रे जळून फुटले आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts