loader
Breaking News
Breaking News
Foto

चेंबूर मध्ये निर्माणाधीन मेट्रोचा काही भाग कोसळला; बायंकर संकट टळले

मुंबई मध्ये चेंबूर भागात मेट्रोचं बांधकाम सुरू असताना अर्धवट बांधकामाचा काही भाग आजुबाजूच्या निवासी सोसायटींवर कोसळला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मेट्रोच्या सळ्या सुमन नगर सोसायटी वर कोसळल्या आहेत. ही घटना सायन ट्रॉम्बे रोड वर ही घटना घडली आहे. सुमारे 20 फूट सळ्या टाकून उभारलेले काम कोसळलं आहे. काम सुरू असताना हा अपघात झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुमन नगर भागात रहिवासी सोसायटी मध्ये सुरक्षा रक्षकाच्या खोलीवर या सळ्या पडल्या. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली. पिलरचे काम डाव्या बाजूला पडलं. हे चुकून उजव्या साईडला पडलं असतं तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

कोणताही सपोर्ट न देता या वीस फुटांच्या सळ्या उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg