loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामस्थांच्या आंदोलन इशार्‍यानेच बांदा-शेर्ले जोडरस्त्याचे डांबरीकरण

बांदा (प्रतिनिधी) : ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर जीवन प्रधिकरण विभागाने बांदा शेर्ले तेरेखोल नदीपात्रातील पुलाच्या दोन्ही बाजूकडील जोडरस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने बांदा व शेर्ले ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नाने जीवन प्राधिकरण विभागाची सासोली (ता. दोडामार्ग) ते वेंगुर्ले जलवाहिनी बांदा आळवाडा येथून नेण्यात आली आहे. यामुळे जलवाहिनी टाकण्यासाठी तेरेखोल नदीवर पूल बांधण्यात आल्याने याचा फायदा शेर्ले दशक्रोशीतील नागरिकांना बांदा शहरात येण्यासाठी झाला आहे. पूल उभारल्यानंतर दोन्ही बाजूला जोडरस्त्याचे काम अपूर्ण असल्याने यठिकाणी बरेच छोटे मोठे अपघात झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रस्त्याचे काम होण्यासाठी शेर्ले ग्रामस्थांनी 26 रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर तात्काळ कामास प्रारंभ करण्यात आला. रस्त्याचे काम करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, माजी उपसरपंच जावेद खतीब, बाळू सावंत, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, उपसरपंच दीपक नाईक, गुरु सावंत, दीपक सावंत, संदीप बांदेकर, सुनील धामापूरकर, राकेश केसरकर, गुरु धारगळकर, आत्माराम गावडे, दया धुरी, विठ्ल जाधव, प्रशांत जाधव, साहिल खोबरेकर, राजेश चव्हाण, शाम सावंत, तातो पावसकर, बाळा शेर्लेकर आदींसह बांदा, शेर्ले ग्रामस्थ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts