loader
Breaking News
Breaking News
Foto

संविधानाची मूल्ये न्याय देण्याचे महत्तम कार्य करतात- राहुल गिरी

केळंबे लांजा (सिराज नेवरेकर) : आपल्या मातीची ओळख महापुरुष आहेत हे कदापि विसरून चालणार नाही. भारतीय संविधानामुळे सामान्यातील सामान्य माणसाला आज प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे आणि संविधानातील महत्त्वाची मूल्ये, घटक आहेत ते स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या चार गोष्टीकडे आपण पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात हीच चार मूल्ये शिवाजी महाराज यांनी राबवली आणि तीच चार मूल्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून स्वीकारून न्याय देण्याचे महत्तम कार्य केले असे प्रतिपादन युवा व्याख्याते व अभ्यासक राहुल गिरी यांनी लांजा तालुक्यातील सापुचेतळे येथे केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा तालुक्यातील आगवे बौद्धिय मंडळ मुंबई ग्रामीण (रजि.) व आम्रपाली महिला मंडळ, जागृती मित्र मंडळ आणि लोकमान्य शिक्षण संस्था संचलित कै. रा. सि. बेर्डे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सापुचेतळे यांच्या संयुक्त विद्यमाने माझे संविधान माझा अभिमान कार्यक्रम दिनांक २६ जानेवारी रोजी संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवा अभ्यासक व व्याख्याते राहुल गिरी (जिल्हा बीड) बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यध्यक्ष केशव कांबळे व अनंत कांबळे, लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लोटणकर, आगवे सरपंच प्रफुल्ल कांबळे, मुख्यद्यापक अनिल गुरव, चंद्रकांत कांबळे, सिद्धार्थ कांबळे, रमेश कांबळे, नारायण कांबळे, योगेश कांबळे, संदेश कांबळे, दशरथ कदम, सुधीर कांबळे, नरेश जाधव उपस्थित होते. माझे संविधान माझा अभिमान कार्यक्रमामध्ये विविध उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण संचालक मंडळ, शिक्षक व अविनाश कांबळे, चंद्रसेन कांबळे, गणपत कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. कर्यक्रमचे सूत्रसंचालन रवींद्र कांबळे यांनी तर आभार अमोल कांबळे यांनी मानले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg