loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची विकास कामांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

राजापूर विधानसभा मतदारसंघाया विकासाला ााालना देण्यासाठी दळणवळण, शैक्षणिक, वेद्यकीय सुविधा, पर्यटन विकास, आपत्ती नियंत्रण, बंदर विकासासाठी आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी लक्ष वेधले आहे. मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टीने त्या कामांना निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी किरण सामंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे त्या विकासाला चालना मिळून रोजगारांच्या संधीमध्ये वाढ होण्यासाठी भरीव निधी मागणी केली आहे. दळणवळण सुविधांमध्ये सागरी महामार्गावरील पुलांचे बांधकाम करणेसाठी रु. 1000.00 कोटी इतका निधी आवश्यक आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 255.81 किमीच्या रस्त्यांसाठी रु. 204.65 कोटी इतका निधी आवश्यक आहे. रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ांना आडवली, विलवडे, सौंदळ, राजापूर रोड येथे थांबे मिळणे आवश्यक आहे. राजापूर रेल्वेस्टेशन येथे सरकता जिना करणेसाठी रु. 15.00 कोटी रेल्वे आरक्षण सुविधा पुर्ववत पोस्ट कार्यालयामध्ये सुरु करणेसाठी कोकण रेल्वे कार्पोरेशन लि. आणि भारतीय डाक विभाग यांच्यामध्ये करार करणे आवश्यक आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चिकित्सा महाविद्यालयाची स्थापना करणे, होमीओपॅथिक महाविद्यालयाची स्थापना करणे, शैक्षणिक सुविधांचे बळकटीकरण करणेसाठी रु. 100.00 कोटांया निधी मागणी केली आहे. पर्यटन विकासाअंतर्गंत या मतदारसंघातील कातळशिल्पांना राष्ट्रीय संरक्षित स्मारकांचा दर्जा देणे, संवर्धन करणे व जोडरस्ते तयार करणेसाठी रु. 50.00 कोटी, सागरमाला अंतर्गत राजापूर तालुक्यातील समुद्र किना-यांवर मुलभूत सुविधा उपलब्ध करणेसाठी रु. 200.00 कोटी, जुवे जैतापूर ता राजापूर येथिल सागरी बेटांचा विकास योजनेअंतर्ग सादर केलेल्या रु. 25.00 कोटी इतक्या प्रस्तावास मान्यता देणे, पुरातन मंदिरे व स्मारके जनत व संवर्धनासाठी रु. 200.00 कोटी, गड किल्ले व ऐतिहासिक ठेवा जतन व संवर्धनासाठी रु. 200.00 कोटीं मागणी केली आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत भूमिगत विद्युत वाहीन्या करणेसाठी रु. 500.00 कोटी, धुपप्रतिबंधक बंधारे बांधणेसाठी रु. 300.00 कोटी, ग्रोयान्स बंधारे व खाडीमुखाजवळील गाळ काढणेसाठी रु. 500.00 कोटी, आपत्तकालिन निवाराशेड बांधणेसाठी रु. 100.00 कोटी, खारभूमी बंधारे बांधणेसाठी रु. 150.00 कोटीं मागणी आहे. बंदर विकासांतर्गंत अणसुरे, धानीवरे, नाटे, साखरीनाटे, कातळी, डोंगर, नाणार (ता. राजापूर) व हर्चे ता. लांजा ही बंदरे विकसित करणेसाठी रु. 200.00 कोटी , बंदर जोडरस्ते विकसित करणेसाठी रु. 400.00 कोटी, डिजिटल इंडिया अंतर्गत प्रामिण भागात दर्जेदार मोबाईल नेटवर्क सुविधा निर्माण करणेसाठी रु. 400.00 कोटी, स्मार्ट सिटी अंतर्गत लांजा व राजापूर शहरासाठी रु. 500.00 कोटी इतका निधी उपलब्ध करुन देणे. वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करणेसाठी रु. 150.00 कोटी मागणी केली आहे. सर्व कामांमुळे नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास हातभार लागेल. सदैव विकासाची तत्वे अग्रस्थानी ठेवत असल्याने या विकासकामांसाठी आवश्यक निधी त्वरित मंजूर करून दय़ावा. या विकासकामांची कार्यवाही लवकरात लवकर सुरू करता येईल. आपल्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने मतदारसंघातील नागरिकांचे स्वप्न साकार होईल, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघचे आमदार किरण सामंत यांनी निवेदनाने केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts