loader
Breaking News
Breaking News
Foto

लोकाधिकार समितीच्या वतीने 11 फेब्रुवारीला सावंतवाडीतील त्या फायनान्स कंपनीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरातील एका फायनान्स कंपनीने नेमळे येथील श्यामसुंदर मालवणकर या व्यक्तीला वाहन कर्ज प्रकरणी घेतलेल्या 11 लाख कर्ज रकमेवर तब्बल 69 लाख एवढा भुर्दंड आकारला आहे. आपल्यावर झालेल्या या अन्यायाच्या विरोधात त्यांनी महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडे धाव घेतली अ सून लोकाधिकार समितीच्यावतीने येत्या 11 फेब्रुवारीला शहरातील त्या फायनान्स कंपनीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा लोकाधिकार समितीचे संस्थापक अध्यक्ष अँड प्रसाद करंदीकर यांनी दिला आहे. अ‍ॅड करंदीकर यांनी आज येथे शासकीय विश्रामगृह येथे समितीच्या पदाधिकार्‍यांसह पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते त्यांच्यासोबत समितीचे जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर, अविनाश पराडकर, संजय पवार, राजेश माने, विवेक नाईक व शामसुंदर मालवणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ते म्हणाले, नेमळे येथील मालवणकर यांनी 2013 साली शहरातील त्या फायनान्स कंपनीने अन्य एका व्यक्तींकडून कर्ज थकीत प्रकरणी ताब्यात घेतलेला डंपर स्वतःला घेतला याकरिता फायनान्स कंपनीकडे 11 लाख रुपयांचे कर्ज प्रकरण केले होते त्यासाठी अडीच लाख रुपये आगाऊ रक्कम ही भरणा केली होती त्यानंतर सदरचा डंपर यांच्या नावे करण्यासाठी संबंधित फायनान्स कंपनीचे गोवा येथील व्यवस्थापकाने त्यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती त्यातील 25 हजार रुपयेही मालवणकर यांनी त्यांना दिले होते. मात्र असे असतानाही सदरचा डंपर त्यांच्या नावे झाला नाही दरम्यान कर्नाटक येथील एका खाजगी कंपनीकडे सदरचा डंपर भाडेतत्त्वावर लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता मात्र वाहन नावावर नसल्याने कंपनीने असमर्थता दर्शवली या दरम्यान ते कर्जाचे नियमित हप्ते भरू शकले नाही, त्यामुळे 2015 साली कर्ज खाते थकीत झाल्याने कोणत्याही सक्षम न्यायालयाच्या आदेशाशिवाय फायनान्स कंपनीने तो डंपर मालवणकर यांच्याकडून ताब्यात घेतला. तसेच आपल्या मर्जीतील ऑब्रिटेटर नेमुन अवाजवी व बेकायदेशीर रक्कमेचा अवॉर्ड पारित करुन घेतला.

टाईम्स स्पेशल

त्यानंतर 2018 साली कंपनीकडून मालवणकर यांना नोटीस पाठवून तब्बल 69 लाख रुपये परतावा करण्याची मागणी करण्यात आली या नोटीसीने मालवणकर यांना धक्का बसला त्यांनी थेट यासंबंधी महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडे दाद मागितली. समितीकडून विविध प्रशासकीय पातळीवर दाद मागून न्याय मिळत नसल्याने तक्रारदारावर या ओढलेल्या अन्यायाच्या विरोधात 11 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता फायनान्स कंपनीच्या सावंतवाडी कार्यालयासमोर धरणे निदर्शन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड. करंदीकर म्हणाले, मालवणकर यांच्याबाबत घडलेल्या प्रकारासारखे अन्य प्रकारही फायनान्स कंपन्यांकडून घडत आहे यामध्ये अनेक जण अडकले असून त्यांना नंतर मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र अशा प्रकारच्या संदर्भात कोणीच पुढे येताना दिसत नाही त्यांच्यावर असे अन्याय झाले त्यांनी निर्भीडपणे पुढे येणे गरजेचे आहे. अशा अन्यायाविरोधात लोकाधिकार समिती निश्चितच आवाज उठवेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts