loader
Breaking News
Breaking News
Foto

जाकादेवी पंचक्रोशीतील व्यापारी व समाजसेवक दत्ताराम उर्फ आप्पा खेडेकर यांचे वृद्धापकाळाने निधन

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी पंचक्रोशी व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच रत्नागिरी तालुका ग्रामीण व्यापारी संघ आणि रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले दत्ताराम गणपत खेडेकर (आप्पा) यांचे वयाच्या 85, व्या वर्षी गुरुवार दि.30 रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. दत्ताराम उर्फ आप्पा खेडेकर यांनी अतिशय कष्टातून आपले जीवन उभे केले. प्रारंभीच्या काळात त्यांनी छोटे किराणा मालाचे दुकान आपल्या आगरनरळ गावी सुरू केले. त्यानंतर अनुभवाच्या आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी आपल्या व्यवसायात मोठी भरारी घेतली. जाकादेवी पंचक्रोशी व्यापारी संघटनेचे सुमारे 20 वर्ष त्यांनी अध्यक्षपदावर राहून त्यांनी अतिशय निष्ठेने काम केले. व्यापारी संघटनेच्या विविध मागण्या पूर्णत्वास जाण्यासाठी आप्पा खेडेकर यांचा वाटा महत्त्वाचा होता. आप्पा खेडेकर यांनी आगरनरळ विद्यालयाला स्वखर्चाने विहीर बांधून दिली. आगरनरळ विद्यालयाची पाण्याची मोठी गरज आप्पा खेडेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी पूर्णत्वास नेली. ते दानशूर व्यक्तिमत्व होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सामाजिक बांधिलकीतून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्याला सढळहस्ते मदत केली आहे. त्यांचा मोठा मुलगा विनय खेडेकर उत्तम व्यावसायिक आहे. दुसरा मुलगा अभय खेडेकर रत्नागिरी तालुका पंचायत समिती सदस्य व सरपंच म्हणून त्यांनी सर्वोत्तम काम केले आहे. त्यांचा सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये मोठा मित्रपरिवार आहे. आप्पांची सूनबाई सौ.अनुष्का अभय खेडेकर यांनी पंचायत समितीचे सभापतीपदही यशस्वीपणे भूषविले व सध्या आगरनरळ गावच्या सरपंच आहेत. तिसरा मुलगा कैलास खेडेकर हे सामाजिक कार्यकर्ते असून ते खालगाव ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच पदावर कार्यरत आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचाही मोठा मित्रपरिवार आहे. आप्पा खेडेकर यांचे कुटुंब शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्राशी खूप जवळचे कुटुंब मानले जाते. आप्पा खेडेकर यांचे सर्व स्तरातील सामाजिक कार्यकर्ते व मित्रपरिवार याच्यांशी निकटचे संबंध होते. त्यांच्या अंत्ययात्रेला, राजकीय सामाजिक व्यावसायिक क्षेत्रातील हजारो लोक सामील होऊन श्रद्धांजली वाहिली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts