loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री शिवाजी वाचन मंदिरातर्फे वाचन संकल्प पंधरवडा साजरा

मालवण (प्रतिनिधी) : मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिर येथे वाचन संकल्प पंधरवडा साजरा झाला. यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. यानिमित्त शिवाजी वाचन मंदिरात आयोजित ग्रंथप्रदर्शनात विविध विषयावरील पुस्तके मांडण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रकाश पटेल यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन झाले. या ग्रंथ प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद लाभला. वाचनालयाचा १०२ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. संध्याकाळच्या सत्रात सामुदायिक वाचनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.विजय नारिंग्रेकर होते. यावेळी डॉ.सुभाष दिघे यांनी वाचनालयाची कामे, वाचनालयाचे उपक्रम तसेच इमारत बांधकाम याविषयी माहिती दिली. यावेळी उपस्थित वाचकांनी सामुहिक वाचन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्राथमिक शाळा रेवतळे मालवण येथे लेखक रुजारिओ पिंटो यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. तसेच श्रीधर काळे, डॉ. सुभाष दिघे, सौ. वैदेही जुवाटकर यांनी मुलांशी संवाद साधला. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई जयंतीनिमित्त बाल वाचकांनी स्वामी विवेकानंदा विषयी माहिती व कथा सांगितल्या. वैदेही जुवाटकर यांनी राजमाता जिजाबाई यांचे जीवन चरित्र उलघडून सांगितले. श्रीधर काळे, प्रभुदास आजगांवकर यांनी देखील बाल वाचकांना मार्गदर्शन केले. तसेच बाल वाचकांकरिता मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन केले होते. आयोजित पुस्तक परिक्षणचा कार्यक्रमात डॉ. सुभाष दिघे यांनी पाकळ्या, श्रीम. अंजली पांजरी यांनी राजराणी मीराबाई, श्रीधर काळे यांनी संगीत आणि स्वास्थ्य, तर रत्नाकर कोळंबकर यांनी प्रेरक प्रसंग या पुस्तकाचे परिक्षण केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts