loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा ग्रामीण रूग्णालयात डायलिसिस रूग्णांना सेवा सुविधा देणार्‍या केंद्राचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण

म्हसळा - रायगड : सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण विभाग अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग आणि एच.एल.एल.लाईफ केअर लि.यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रूग्णालय म्हसळा येथे राज्याच्या महीला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या खास प्रयत्नाने म्हसळा ग्रामीण रूग्णालयात जिल्हयात डायलिसिस रूग्णांना मोफत सेवा सुविधा देणारे केंद्र मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या रुग्णालयात स्वतंत्र कक्षात 5 डायलिसिस मशीन व बेडची व्यवस्था करण्यात आली असून दिवसाला 15 डायलिसिस रूग्णांना सेवा सुविधा देणारे रायगड जिल्हयातील सर्वात मोठे केंद्र असणार आहे. अशा प्रकारे जिल्हयात 32 केंद्र मंजुर करण्यात आले आहेत. संपुर्ण राज्यात शासनाने 400 डायलिसिस केंद्रांना मंजुरी दिली असून त्यामधे रोज 3000 फॅसिलिटी असणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी डायलिसिस मशीन उद्घाटन समारंभाला मनोगत व्यक्त करताना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्रीवर्धन मतदार संघात श्रीवर्धन येथे 2 सेवा केंद्र, माणगाव 2, आणि रोहा येथे 3 मशीन ऊपलब्ध आहेत. मंत्री आदिती तटकरे यांनी लोकसेवे बाबत अधिक बोलताना आता जशा प्रकारे सेवा सुविधा देण्याचे काम सुरु आहे तसेच काम सातत्याने पुढे चालु राहील. आम्ही देत असलेली सेवा आपल्या सर्वांच्या मदतीने पुढाकार घेऊन देता आली याचे समाधान व्यक्त केले. प्रास्ताविकात वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रफुल्ल पावसेकर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हसळा सारख्या दुर्गम भागात असणार्‍या ग्रामीण रूग्णालयात मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने 5 डायलिसिस बेड मंजुर होणे हे येथील रूग्ण सेवेचे मोठी सेवा आहे. येथे आवश्यक लागणार्‍या आरोग्य सेवा सुविधा देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण शिंदे यांनी माहिती देताना महाडायलिसिस स्वस्थ आरोग्याची हमी हि सेवा महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य सेवा योजणे अंतर्गत मोफत डायलिसिस, औषध आणि इंजेक्शन दिले जाणार असल्याचे सांगितले.

टाईम्स स्पेशल

म्हसळा ग्रामीण रूग्णालयात डायलिसिस केंद्र उद्घाटन समारंभाला मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, स.पो.निरिक्षक संदीप कहाळे, सा.बांधकाम अभियंता महाजन, तालुका अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा चिटणीस महादेव पाटील, नगराध्यक्ष संजय कर्णिक, महीला अध्यक्षा मिना टिंगरे, माजी सभापती बबन मनवे, छाया म्हात्रे, शगुप्ता जहांगीर, रेश्मा काणसे, महीला प्रमुख सोनल घोले, संदीप चाचले, नगर पंचायत समिती सभापती सुनिल शेडगे, गण अध्यक्ष सतीश शिगवण,भाई बोरकर, माजी नगराध्यक्ष असहल कादीरी, अनिल बसवत, शेखर खोत, बिलाल कौचाली, संतोष सावंत, महेश घोले, किरण पालांडे, वृषाली घोसालकर, नगर पंचायत समिती सभापती राखी करंबे, सभापति नौसिन चोगले, सभापती सुमैया आमदानी, कासिम मेमन, नगरसेवक जंजिरकर, शगुपता जहांगीर, सलीम चोगले, आदी मान्यवर पदाधिकारी, विविध खात्यांचे अधिकारी, पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts