loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत भ्रष्टाचाराविरोधात उपोषण केल्याचा राग मनात धरून उपोषणकर्त्याला मारहाण

दापोली (वार्ताहर) :- पत्तन विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या मयूर मधुकर मोहिते यांना सहाय्य स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश रमेश जाधव यांनी कार्यालयातच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार दापोलीत उघडकीस आला आहे. यामुळे दापोलीत खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मयूर मधुकर मोहिते हे प्रजासत्ताक दिनी दापोली तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले होते. सहाय्यक पत्तन अभियंता पत्तन उपविभाग दापोली कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश जाधव यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ते उपोषणाला बसले होते. त्यांच्या दोन दिवस चाललेल्या उपोषणानंतर राकेश जाधव यांची रत्नागिरी येथे बदली करण्यात आल्यावर त्यांनी उपोषण मागे घेतले होते. यानंतर ते शुक्रवारी दुपारनंतर सहाय्यक पतन अभियंता कार्यालयात कागदपत्रांची मागणी तयार करण्याकरता गेले होते. यावेळी अचानक तेथे राकेश जाधव हे मद्यप्राशन करून आले व त्यांनी मयूर मोहिते यांना लाथा बुक्क्‌यांनी मारहाण केल्याचा आरोप मधुकर मोहिते यांनी केला आहे. मारहाण करत असल्याचा व्हिडिओ मधुकर मोहिते यांनी चित्रीत केला व याबाबत दापोली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. दापोली पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून दापोली पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. या झालेल्या प्रकाराने दापोलीत खळबळ माजली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts