loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीतील मिलाग्रीस चर्चला मिळणार नवी झळाली ; आर्थिक सहकार्यासाठी फादर डिसोझा यांचे आवाहन

सावंतवाडी : सावंतवाडी मिलाग्रीस चर्च हे जिल्ह्यातील एक प्रमुख चर्च आहे. सन 1652 ला ते बांधलं गेलं असून ते नादुरुस्त झाल्याने दुरूस्ती करण्याची गरज होती. त्यानुसार नवीन बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. सिंधुदुर्गतील हे चर्च मिलाग्रीस कॅथेड्रल अर्थात मदर चर्च म्हणून घोषित झाले आहे. या चर्चसाठी आर्थिक सहकार्याची गरज असून सर्वधर्मियांनी या ऐतिहासिक वास्तूसाठी हातभार लावावा. आर्थिक वा साहित्यरूपात ही मदत करावी असे आवाहन पॅरिश प्रिस्ट, फादर मिलेट डिसोझा यांनी केलं आहे. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. फा. डिसोझा म्हणाले, आज या चर्चला नवसंजीवनी देण्यासाठीच काम सुरू आहे. लोकांच्या मागणीनुसार वरील ठिकाणीच ते नव्याने बनविण्यात येत आहे. यासाठीच्या सगळ्या परवानग्या आम्ही घेतल्या आहेत. सिंधुदुर्ग मधील सर्वांत मोठं हे चर्च आहे. साधारण 1500 लोक बसतील एवढे मोठं चर्च इथं उभारलं जात आहे. यासाठी 12 ते 15 कोटी खर्च प्रस्तावित आहे. 50 टक्के काम पूर्ण झाल असून उर्वरीत बाकी आहे. पुढील वर्षापर्यंत हे चर्च पुर्णत्वास न्यायचं आहे. यासाठी सिंधुदुर्गच्या लोकांना आम्ही योगदान देण्याच आवाहन केलं आहे. सावंतवाडीतील अधिक लोकांचा हातभार याला मिळाला आहे. पुढच्या मे पर्यंत आम्ही याच उद्घाटन करणार असून या चर्चेच्या उर्वरित कामासाठी सर्वधर्मीय बांधवांनी हातभार लावावा, आर्थिक वा साहित्य स्वरूपात ही मदत करावी असे आवाहन फादर मिलेट डिसोझा यांनी केले आहे. यावेळी फादर मिलेट डिसोझा, आनारोजिन लोबो, ग्रेगोरि डान्टस आगोस्तिन फर्नांडिस, व्हिक्टर फर्नांडिस, अ‍ॅनथोनि डिकोना आ़दी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ते पुढे म्हणाले, हे चर्च गोवा आर्चडायसिसच्या अधिकार क्षेत्रात होते. हे चर्च तेव्हापासून सिंधुदुर्गातील लोकांच्या आध्यात्मिक उद्धारासाठी व शैक्षणिक प्रगतीसाठी कार्यरत होते. नंतर ते पुणे डायसिसमध्ये बदली करण्यात आले. 2005 मध्ये लोकसंख्येच्या वाढीमुळे सिंधुदुर्ग पुणे बिशपच्या अधिकारातून विभागले गेले आणि स्वतंत्र सिंधुदुर्ग धर्मप्रांत म्हणून वेगळे करण्यात आले. या सिंधुदुर्ग धर्मप्रातांमध्ये अनेक शैक्षणिक तसेच सामाजिक संस्था आहेत. ज्यात मुला-मुलींसाठी वसतीगृहे, बोर्डिंगस्कूल, सामाजिक सेवा केंद्रे, वृध्दाश्रम यांचा समावेश आहे. यातून त्यांच्याकडे असणारी समाजाप्रती सामाजिक बांधिलकी सिद्ध होते. हे प्रस्तावित चर्च इमारतीद्वारे कॅथॉलिक समुदायाच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करेल. तसेच चर्च कार्यालय, पॅरीश हाऊस, भूमिकत पार्किंग आणि इतर सुविधा निवासी धर्मगुरु आणि पॅरीशच्या प्रशासनाच्या गरजांची पूर्तता करणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 12 कोटी आहे. या कार्यासाठी योगदान देऊन सहकार्य करावे असे आवाहन फा.डिसोझा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9423832953, 7378832132वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts