loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी केला स्विय सहाय्यक संतोष शिंदे यांचा जाहीर सत्कार ---

दापोली (प्रतिनिधी)- श्रद्धा शिक्षण संस्था दापोली व वेळवी पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला २५ वर्ष पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा प्रमुख मान्यवरांचे उपस्थित संपन्न झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधत माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्या तब्बल २५ वर्षाच्या आमदारकीच्या काळात स्विय सहाय्यक म्हणून अतिशय चोख आणि नेटाने भुमिका निभावत लोकप्रतिनिधी, तसेच सर्वांशीच समन्वयाची भुमिका पार पाडणारे स्विय सहाय्यक संतोष शिंदे यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू करताना आणि ती पुढे कार्यरत ठेवताना सुर्यकांत दळवी यांचा महत्वाचा दुवा साधण्याचे काम इमाने इतबारे केले. ते शिक्षण संस्थेचे साक्षीदार आहेत यशस्वीतेसाठी त्यांचाही इतरांसोबतच खारीचा वाटा आहे याची जाणीव ठेवून संतोष शिंदे यांचा श्रध्दा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी मुंबै बॅकेचे अध्यक्ष आम. प्रवीण दरेकर, दापोली कोकण कृषी विदयापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे ,मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन जाहीर सन्मान केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts