loader
Breaking News
Breaking News
Foto

भाईसाहेब सावंत यांचा अर्धाकृती पुतळा अनावरण व स्मरणिका प्रकाशन सोहळा ४ फेब्रुवारीला ---

सावंतवाडी- शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी व नाम. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान सावंतवाडी आयोजित लोकनेते, कॅबिनेट मंत्री नामदार स्व. भालचंद्र अनंत तथा भाईसाहेब सावंत यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त अर्धाकृती पुतळा अनावरण व स्मरणिका प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येत्या दि.४ फेब्रुवारीला सावंतवाडी येथे हा सोहळा संपन्न होणार असून दिग्गज मान्यवर या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती नाम. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

येथील राणी पर्वती देवी हायस्कूलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, खजिनदार सी.्‌एल.नाईक, प्रा. बाळासाहेब नंदीहळ्ळी, मनोहर वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. श्री. सावंत म्हणाले, माजगाव येथील स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या ’प्रेरणा’ समाधीस्थळी अर्धाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे त्याच्या अनावरण सकाळी ९.३० ला करुन आदरांजली वाहिली जाणार आहे. तद्नंतर १०.३० वा. राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात त्यांच्या स्मृतीपित्यर्थ स्मरणिका प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. स्मरणिका प्रकाशनातून येणार्‍या निधीतून गोरगरीब मुलांना कायमस्वरूपी मतद व्हावी असा यामागचा शिक्षण प्रसारक मंडळाचा हेतू आहे. भाईसाहेब सावंत यांनी केलेली काम कार्य लक्षात घेता तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, सहकार, शैक्षणिक संस्था या आमच्यासाठी एक प्रकारे जिवंत स्मारक आहेत.

टाइम्स स्पेशल

श्री. सावंत पुढे म्हणाले, या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री अँड रमाकांत खलप असणार असून माजी मुख्यमंत्री खास. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, माजी पालकमंत्री आमदार रविंद्र चव्हाण, सावंतवाडी संस्थानचे खेमसावंत भोसले, आम. निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तसेच आमदार शेखर निकम, माजी खासदार विनायक राऊत, रायगड जिल्हा बँक अध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार अँड अजित गोगटे, माजी आमदार बाळाराम पाटील, रत्नागिरी जिल्हा बँक अध्यक्ष तानाजी चोरगे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी अध्यक्ष सतिश सावंत, अरूण दुधवडकर, कॉग्रेसचे अजिंक्य देसाई आदींची उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त भाईसाहेब सावंत प्रेमीनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts