loader
Breaking News
Breaking News
Foto

माघी गणेशोत्सव; लांजाच्या राजाचे ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने आगमन ---

लांजा (संजय साळवी)- लांजा शहरातील सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ बाजापेठ लांजा आयोजित माघी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी लांजाच्या राजाचे ढोल - ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजित, भक्तिमय वातावरणात, अत्यंत दिमाखात मिरवणुकीने आगमन झाले. शुक्रवारी सायंकाळी लांजाच्या मुख्य बाजारपेठेतुन निघालेल्या या लांजाच्या राजाच्या मिरवणुकीने शहरातील वातावरण काही काळ भक्तिमय झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही शनिवार दि. १ फेब्रुवारी ते मंगळवार दि. ११ फेब्रुवारी या कालावधीत सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाच्यावतीने माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने सलग अकरा दिवस धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अकरा दिवसांच्या कालावधीत हजारो गणेशभक्त लांजाच्या राजाच्या दर्शनाला हजेरी लावतात. यावर्षी या माघी गणेशोत्सवाचे ३४ वे वर्ष आहे. लांजाचा राजा अशी या माघी गणेशोत्सवाची संपूर्ण तालुक्यात ओळख आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts