loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा नगरपंचायतीला अग्निशमन बंब केव्हा मिळणार?

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : लांजा तालुक्यात आगीच्या घटना घडत असताना लांजात अग्निशमन बंब नसल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे अशक्य झाले आहे. आग लागली की, अग्निशमन बंबची आठवण येते. लांजा नगरपंचायत गठीत होऊन बारा वर्षे झाली. पंचवार्षिक दोन वेळा निवडणूका झाल्या पण लांजा तालुक्यासाठी एखादा बंब नसावा हेच तालुक्यातील जनतेचे दुर्दैव असल्याचे बोलले जात आहे. लांजा तालुक्यातील पालु चिंचुर्डी धावडे वाडीतील प्रकाश रघुनाथ धावडे यांचे घर शॉट सर्किट मुळे आगीत भस्मसात झाले. दोन दिवसांपूर्वीची ताजी घटना आहे. या आधी लांजा शहरातील काही दुकाने, फळ बागांना आगी लागून भस्मसात होण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र तालुक्यात बंब नसल्यामुळे आगीवर नियंत्रण आणता येत नाही, राजापूर किंवा रत्नागिरी येथून बंब येईपर्यंत सर्व काही जळून खाक होते. लांजा शहर झपाट्याने वाढत आहे. मोठमोठी कॉम्प्लेस उभी रहात आहेत. लांजा शहरात आगीच्या घटनावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरासह तालुक्यासाठी अग्निशमन बंबची आवश्यकता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा कुवे नगरपंचायत झाल्यामुळे लांजा शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असे नगरवासियांतून बोलले जाते. नगरपंचायत क्षेत्राचा विकासाचा रचनात्मक आराखडा तयार करून त्या दृष्टीने सर्वांगीण विकास साधला जाईल अशी मागणी नागरीकांतून करण्यात आली. मात्र आजही पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे नगरवासियांतून बोलले जात आहे. लांजा शहरासाठी अग्निशमन बंबची तरी गरज पूर्ण होईल का? अशी विचारणा नगरवासियांतून केली जात आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष मनोहर बाईत यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता सात ते आठ महिन्यापूर्वी अग्निशमन बंबसाठी प्रस्ताव करण्यात आला आहे. कार्यवाही सुरू असून लवकरच लांजा नगरपंचायतीला बंब मिळेल, असे त्यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts