loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील भाविकांच्या गाडीला अपघात; ४ जबर जखमी

रत्नागिरी (टाइम्स न्यूज नेटवर्क) : कुुंभमेळासाठी प्रयागराज येथे गेलेल्या रत्नागिरीतील भाविकांच्या गाडीला पहाटे चार वाजता नाशिक रोडवर भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण जबर जखमी झाल्याचे वृत्त आहे. रत्नागिरीतील मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य श्री.प्रताप सावंतदेसाई सर, श्रीराम मंदिराचे मानकरी श्री.किरण निकम, त्यांचे चिरंजीव व गाडीचे चालक श्री.झगडे हे चौघे जबर जखमी झाल्याचे वृत्त आज सकाळीच रत्नागिरीत येऊन धडकले. या गाडीतून दहा जण कुंभमेळासाठी गेले होते. त्यामध्ये श्री.किरण निकम व त्यांचे दोन चिरंजीव होते. पैकी एक चिरंजीव जबर जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यांचे वडील श्री.किरण निकम यांचीही प्रकृती गंभीर आहे. या चौघांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गाडीमध्ये श्रीराम देवस्थानचे विश्‍वस्त श्री.संतोष रेडीज व देवस्थानचे मानकरी तसेच ज्येष्ठ नागरिक कट्टयाचे श्री. रमाकांत पांचाळ हे देखील होते. ते देखील काही प्रमाणात जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी हे वृत्त रत्नागिरीत येऊन धडकताच अनेकांनी याबाबत शोक व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts