loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड-पालवणे धनगरवाडी येथे बिबट्याचा धुमाकूळ, एकाच रात्री ५ गाई-वासरांचा मृत्यू

खेड (दिलीप देवळेकर) : तालुका मंडणगड, पालवणे धनगरवाडी येथील गरीब शेतकरी विठ्ठल गुणाजी हिरवे यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने ५ गाई-वासरांना मारल्याने या गरीब शेतक-याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पालवणे धनगरवाडी परिसरात मागील अनेक दिवस बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे त्यामुळे या विभागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा लवकरच वनविभागाने बंदोबस्त करून पालवणे पंचक्रोशीतील नागरिकांना भयमुक्त करावे अशी या विभागातील जनतेची मांगणी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेची माहिती स्थानिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांच्या मार्फत धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांना कळविल्यानंतर रामचंद्र आखाडे यांनी तातडीने मंडणगड तालुक्याचे वनविभागाचे वनपाल श्री.दळवी यांना सदर घटनेची तातडीने माहिती दिली व वनविभागाने तत्परतेने दखल घेऊन घटनास्थळी जाऊन रितसर पंचनामे करून योग्य ती भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन विठ्ठल गुणाजी हिरवे यांना दिले आहे. अशा काही दुर्घटना घडल्यास तातडीने शासकीय मदतीचे सहकार्य मिळवून देण्यासाठी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी प्रयत्न करेल असे या संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र बाबू आखाडे यांनी जाहीर केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts