अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आठवा अर्थसंकल्प सादर करताना देशभरातील शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखांवरून पाच लाखांवर करण्याची घोषणा निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पातून केली. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार, मार्च 2024 पर्यंत, देशातील किसान क्रेडिट कार्ड (KCC) धारकांची संख्या 7.75 वर पोहोचली आहे. कोटी या योजनेतील थकीत कर्जाची रक्कम 9.81 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा राज्यांसोबत भागीदारीत धनधान्य योजना राबवणार कृषी जिल्हा विकास योजना असेल कमी उत्पादन होणाऱ्या 100 जिल्ह्यांत योजना राबवणार 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांना लाभ होईल उत्पादकता वाढवणे, पीक विकास,साठवणूक वाढवणार, सिंचन वाढवणार,लघु व मध्यम मुदतीचं कर्ज देणार, डाळींमध्ये देश आत्मनिर्भर बनवणार, तेलबियांप्रमाणं आता डाळींसाठीही योजना राबवणार, डाळींसाठी ६ वर्षांचा आत्मनिर्भर अभियान राबवणार, तूर,उडीद आणि मसूर दाळींवर अभियानावर लक्ष केंद्रीत, नाफेड,एनसीसीएफसारख्या संस्था डाळींची खरेदी करेल, नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून केंद्रीय संस्थांकडून डाळखरेदी, भाजीपाला आणि फळांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम, उत्पादन,प्रभावी पुरवठा आणि योग्य किंमत देणार फळे-भाज्यांचा कार्यक्रम राबवणासाठी नवी यंत्रणा उभारणार, मत्स्यउत्पादनात भारत जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर, सागरी अन्नाची निर्यात 60 हजार कोटी इतकी आहे, मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी तीन ठिकाणी लक्ष केंद्रीत करणार, अंदमान,निकोबार,लक्षद्वीपमध्ये मत्स्यउत्पादन वाढवणार, कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी पाच वर्षांचे विशेष अभियान, कापसाच्या विविध जाती विकसित करणार , विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कापूस उत्पादनाला जोड देणार, दर्जेदार कापूस निर्यातीवर सरकार भर देणार,
टाइम्स स्पेशल
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.