loader
Breaking News
Breaking News
Foto

बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार-२०२४ तक्षशिला ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था मर्या.पाली यांना प्रदान

पाली (वार्ताहर) : अविज पब्लिकेशन बँको कोल्हापूर व गॅलक्सी इन्मा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा प्रशंसनिय बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार २०२४ AMBY VALLY CITY लोणावळा येथे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी पुणे यांच्या हस्ते तक्षशिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पाली, रत्नागिरी यांना प्रदान करण्यात आला. अविनाश शिंत्रे, अशोक नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर पुरस्कार १५कोटी ठेव विभागामध्ये प्रथम क्रमांक देण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे अध्यक्ष नितीन कांबळे, उपाध्यक्ष अमोल सावंत, संस्थेचे संचालक, सिईओ प्रविण गुरव, व्यवस्थापक विनायक शिर्के, व्यवस्थापन समिती सदस्य मंगेश मोरे व आनंद नेवरेकर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल पाली गावचे प्रमुख संतोष सावंत देसाई, जेष्ठ उद्योजक आण्णा सामंत, जिल्हा बँक संचालक रामभाऊ गराटे व परिसरातील पतसंस्था हितचिंतक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts