loader
Breaking News
Breaking News
Foto

छत्रपती युवा सेना गुहागर तालुका अध्यक्षपदी सचिन कोंडविलकर

संगलट-खेड (इक्बाल जमादार) : गुहागर तालुक्यातील जानवळे गावचे सुपुत्र तसेच महात्मा गांधी समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा या क्षेत्रामध्ये विशेष योगदान देणारे शिवसेना उबाठा गटाचे युवा नेते ,सचिन सुरेश कोंडविलकर यांची नुकतीच छत्रपती युवा सेना गुहागर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती युवा सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गणेश भाऊ कदम यांच्या मध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात ही युवा सेना शिवछत्रपतींचे विचार व त्यांची कार्यप्रणाली घराघरापर्यंत पोहचवित आहेत. याचाच एक भाग म्हणून गुहागर तालुक्यात सदरची संघटना बळकट करुन शिवरायांच्या विचाराशी सर्व तरुण जोडले जावेत म्हणूनच सचिन कोंडविलकर सारख्या सामाजिक कार्यकर्त्याची या पदावर नियुक्ती जिल्हाध्यक्ष रियाज ठाकूर यांनी केली आहे.

टाइम्स स्पेशल

सचिन कोंडविलकर सध्या जानवळे गावचे महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष, जानवळे ग्रामदेवता विकास मंडळाचे सदस्य, श्री शृंगारतळीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य अशा विविध पदांच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य सुरु आहे. कोरोना सारख्या महाभयंकर जागतिक समस्येच्या वेळी सचिन कोंडविलकर यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांची छत्रपती युवा सेना तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर तालुकाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts